स्वच्छतेचा संदेश देणारी बेबीबाई अनंतात विलीन

सामाजिक दायित्व स्वीकारून एक हात मदतीच्या ग्रुपने केले अंतिम संस्कार 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - भंडारा येथील निराधार व स्वच्छता दूत म्हणून परिचित असलेली बेबीबाई यांचे निधन शासकीय रुग्णालय येथे झाले. सामाजिक दायित्व स्वीकारून एक हात मदतीच्या ग्रुपने  केले अंतिम संस्कार केले. माणुसकीला खांदा या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक सर्वत्र होत आहे.पवनी येथील जवाहर गेट जवळ स्वच्छता करीत असणारी बेबीबाई मनोरुग्ण असली तरी तिची कृती देखावा करणाऱ्या स्वच्छता दूताला लाजवणारी होती. खऱ्या अर्थाने कुठलाही स्वार्थ न बाळगणारी किंवा प्रसिद्धी मागे न लागणारी प्रामाणिक स्वच्छता करणारी बेबीबाई सर्व पवनीकारांना सुपरिचित असलेली बेबी बाई ही मुळ खैरी दिवाण या गावची होती. गेल्या दहा वर्षापासून ती पवनी येथे राहत होती. ती मनोरुग्न होती परंतु स्वच्छता दूत सुद्धा होती. काल अचानक लता हॉस्पिटल ताडेश्वर वॉर्ड पवनी समोर बेबीबाई सकाळपासूनच निद्रावस्थेत होती ती सकाळपासूनच निद्रावस्थेत का आहे म्हणून अडकिने नावाची एक चहा हॉटेलची मालकीण तिच्या जवळ गेली तिला विचारपूस आणि काहीतरी तिच्यावर इलाज करावा या विचाराने तिच्या जवळ गेली होती. परंतु तिची परिस्थिती पाहता ती अक्षरशः घाबरली आणि लगेच  समाजसेवक किशोर पंचभाई यांना फोन केली किशोर पंचभाई यांनी अक्षय तलमले ला फोन करून ॲम्बुलन्स पाठवली लगेच शुभम धूर्वे व तलमले यांनी बेबीबाई ला ग्रामीण रुग्णालय पवनी येथे भरती केले. ते तिच्याजवळ जवळपास तीन तास तिच्या इलाज होईपर्यंत थांबले नंतर ते दवाखान्यातून निघून आले आणि  सकाळी नऊ वाजता डॉ.निशान मोहरकर यांच्या फोन किशोर पंचभाई यांना गेला आणि आपण  काल भरती केलेल्या बेबीबाई मरण पावल्या आता कसं करता अशी विचारणा केली किशोर पंचभाई यांनी आम्हीच तिच्या अंतिम संस्कार सुद्धा करू तोपर्यंत आपण तिला सुरक्षित जागेत ठेवा असे सांगितले काही वेळातच किशोर पंचभाई आणि सगळे एक हात मदतीचे कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालय पवनी येथे बेबीबाई जवळ पोहोचले लगेच अंतिम संस्कार लागणारा साहित्य घेऊन आले एक वाजेचे अंतिम यात्रा ठरली तयार करण्यासाठी माझ्या गाड्या सगळे व्यवस्थित झाली. तेवढ्यातच फोन येऊ लागले की काय बीपी व्हायचे रिश्तेदार सुद्धा ग्रामीण रुग्णालय पोहोचत आहेत त्यांची एक दोन वाट पाहली बेबी बाई चे नातेवाईक पोहचले लगेच एकात्मतेचे ग्रुपचे कार्यकर्ते व नातेवाईक बेबी वाला खांद्यावर घेत ग्रामीण रुग्णालय पवनी येथून वैजेश्वर मोक्षधामकडे निघाले वैजेश्वर मोक्षधाम वर अंतिम यात्रा पोहोचली व त्या  ठिकाणी अग्नी देत अंतिम संस्कार करून मनोरुग्ण, स्वच्छता दूत बेबीबाई ला अखेरच्या निरोप देण्यात आला अशा याएक हात मदतीच्या माणुसकीला खांदा उपक्रमाची गावात खुप चर्चात्मक कौतुकही होत आहे. यावेळी मयूर रेवतकर ,संविधान नावनांगे तुषार रंगारी ,अक्षय तलमले शुभम धुर्वे, अतुल  तलमले, मुकेश जांभूळकर रोहीत नागपुरे,युगल हटवार ,सतीश जांभुळकर, योगेश निखारे, धनराज उपरीकर ,स्वप्निल बावनकर,पिंटू वंजारी अजून इतरही कार्यकर्ते सोबत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]