विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडून आदिवासी गावात दिवाळीनिमित्त फराळ व साहित्य भेट

विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेकडून आदिवासी गावात दिवाळीनिमित्त फराळ व साहित्य भेट
सावली -  विरोधीपक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे  आमदार विजय वडेट्टीवार हे नेहमी जनसेवेच्या कामात सक्रिय असतात. दिवाळी सण सर्व घरात साजरा व्हावा या उद्देशाने आदिवासी समाजातील गावात फराळ व कापडाचे साहित्य वाटप करण्यात आले. संपूर्ण आदिवासी वस्तीचे सादागड, सादागड हेटी, मानकापूर, चक मानकापूर, मेटेगाव, पांढरसराड, भानापूर, जनकापूर या गावात प्रत्येक कुटुंबाला दिवाळीनिमित्त भेटवस्तू देण्यात आले. 
फराळ व साहित्य वाटपाचे कार्य सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष  नितिन गोहने, भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार,  सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नगरसेवक विजय मुत्यालवार, सावली शहर युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमर कोणपत्तीवार,नगरसेवक प्रफुल वाळके, नगरसेवक सचिन सांगिडवार, दिलीप लटारे, बाजार समितीचे संचालक  खुशाल लोडे, राजू कंचावार, श्रीकांत बहिरवार, राजू वलके, राजू बुरीवार, यशवंत ताडाम, शरद मडावी, अनिल कुळमेथे, प्रकाश वेटे, मिनेश मडावी, अशोक दलांजे,  वैभव गुज्जनवार, हेमंत धुर्वे, सुशील डहलकर, अशोक अलाम, मा.विठ्ठल मंगर, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, यश गेडाम उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]