मोखाळा व साखरी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता @ सरपंचासहित सात उमेदवार विजयी

मोखाळा व साखरी ग्रामपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता 
सरपंचासहित सात उमेदवार विजयी
सावली :- सावली तालुक्यातील मोखाळा व साखरी ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला असून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ.प्रणिता अनिल मशाखेत्री यांचेसह काँग्रेस पक्षाचे ७ सदस्य निवडून आले आहेत. 
        सावली तालुक्यातील मोखाळा ग्रामपंचातीची सार्वत्रिक निवडणुक ५ नोव्हेंबर ला पार पडली, ही निवडणूक थेट सरपंच पदासाठी होती. सरपंच पदासाठी ३ उमेदवार रिंगणात होते तर ९ सदस्य पदासाठी १८ उमेदवारांनि निवडणूक लढवली होती.त्यात काँग्रेस पक्षाचे सरपंचासहित ७ उमेदवार निवडून आले व एकहाती सत्ता मिळवली. तर ग्रामपंचायत साखरी येथे पोटनिवडणुकीत निलेश रामचंद्र पेंदोर हे काँग्रेस कडून तर भा.ज.प कडून भैयाजी गेडाम हे रिंगणात होते त्यात निलेश रामचंद्र पेंदोर हे विजयी झाले.साखरी सरपंच पद हे अनुसूचित जमाती करिता राखीव असल्याने निलेश पेंदोर हे सरपंच पदाचे एकमेव दावेदार आहेत.
         सावली तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे अथक परिश्रमातून दोन्हि ग्रामपंचायती वर विजय मिळाल्याबद्दल जनतेचे आणि नवनियुक्त सरपंच, सदस्यांचे  विरोधी पक्षनेते  विजय वडेट्टीवार यांनी अभिनंदन केले आहे.
     निकालप्रसंगी माजी बांधकाम सभापती जि.प.चंद्रपूर दिनेश पा.चिटणुरवार, सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहणे, माजी सभापती पं.स.सावली राकेश पाटील गड्डमवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हिवराज पाटील शेरकी, सावली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय मुत्यालवार,नगराध्यक्षा लताताई लाकडे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष  पुरषोत्तम चुधरी , युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर कारडे नगरसेवक प्रितम गेडाम, सामाजिक कार्यकर्ते निखिल सुरमवार, किशोर पाटील गड्डमवार, अनिल मशाखेत्री, दिलीप लटारे, संदीप जुनघरे, सुनील पाल, जनसंपर्क कार्यालय प्रमुख कमलेश गेडाम, जगदीश वासेकर, रुपेश किरमे व तालुक्यातील जेष्ठ कार्यकर्ते नेते व असंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]