भीम जन्मभूमी येथे सभापती राकेश रत्नावार यांची भेट
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेशभाऊ रत्नावार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच जन्म गाव मध्यप्रदेश मधील "महू"या गावी भेट दिली. जनतेला त्यांनी एकदा नक्की भेट द्या असे सांगितले.

भीम जन्मभूमी हे मध्य प्रदेश राज्यातील डॉ. आंबेडकर नगर (पूर्वी महू) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना समर्पित असलेले एक स्मारक आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी लष्करी छावणी असलेल्या महू गावात भीमाबाई व रामजी बाबा यांचे पोटी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.(महू गावात लष्करी छावणी असल्याने त्या स्थानाला Military Headquarters of War-MHOW हे नाव होते. पुढे त्याच महू नावाने ते गाव ओळखले जाऊ लागले. आंबेडकरांच्या जन्माचे महत्त्व जाणून तेथील आंबेडकरवादी लोकांनी महू गावात आंबेडकरांचे एक भव्य स्मारक उभे केले आहे. यासाठी राज्य शासनाकडून देखील काही सहकार्य त्यांना झाले. या स्मारकाचे भूमिपूजन १४ एप्रिल १९९१ रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या हस्ते झाले. १४ एप्रिल २००८ रोजी स्मारकाचे लालकृष्ण आडवाणी यांचे हस्ते लोकार्पण केले गेले. प्रत्यक्षात लष्करी छावणीतील आंबेडकरांचे एके काळचे राहते घर ताब्यात घेण्यासाठी १७ वर्ष प्रयत्न करावे लागले, त्यानंतर स्मारक उभारण्यासाठी त्यापुढील २० वर्षे लागली.
एकूण ३७ वर्षांच्या प्रयत्नांनंतर २२ हजार चौरस फूट जागेत जन्मभूमीवर दोन मजली विहार तयार झाले. स्मारकाची रचना वास्तुविशारद ई.डी. निमगडे यांची आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]