गोंदिया - वडसा- चंद्रपूर रेल्वे पैसेजर बंद : प्रवासाना अडचण
तळोधी (बा.)  सणासुदीच्या काळातच गोंदिया -वडसा-चद्रपूर बल्लारपूर या रेल्वे मार्गाने धावणाऱ्या तिनं मेमू  पैसेजर रेल्वे गाड्या बंद असल्याने व सुरू असलेल्या तिन रेल्वे मेमू पैसेजर गाड्या अवेळी येत असल्याने रेल्वे स्थानकांवर जत्रेचे स्वरूप आले असुन प्रवासी कमालीचे त्रस्त असल्याचे चित्रं पाहायला मिळतं आहे.
  सध्या भाऊबीजेसाठी वडसा, ब्रम्हपूरी, नागभिड, सिन्देवाही, मुलं, या तालुक्यातील प्रवासी वाहतुक खुप मोठ्या प्रमाणांत आवागमन सुरू आहे. मात्र रेल्वे गाडी नबंर ०८८०६ गोंदिया - वडसा पैसेजर, ही गाडी ९ ऑगस्ट पासुन अनिश्चित कालावधीसाठी बंद आहे. तर गाडी नबंर ०८८०८ वडसा - नागभिड मेमू पैसेजर ही गाडी १० ऑगस्ट पासुन अनिश्चित काळासाठी बंद आहे. तर  गाडी नबंर ०८८०५ गोंदिया - नागभिड चांदाफोर्ट ही गाडी अनिश्चित काळासाठी बंद करण्याबाबत आली आहे. परिनामी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळतं असुन प्रवासी वर्गात तीव्र संतापाची लाट पसरली आहे.  मात्र गोंदिया रेल्वे स्थानकांवर सुरक्षा संबंधी कार्य व गाड्या वेळेवर चालवने यांत सुधारणा करण्यासाठी तिनं पैसेजर रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. मात्र या रेल्वे मार्गावर आवागमन करणाऱ्या सर्व पैसेजर रेल्वे गाड्या त्वरीत सुरू करण्यात यावे अशी मागणी प्रवास्याने केली आहे.


रेल्वे प्रशासनाने अनिश्चित काळासाठी बंद केलेल्या पैसेजर गाड्या त्वरित सुरू करण्यात यावे.
      संजय गजपूरे,
 ZRUCC सदस्य, दपुम रेल्वे, बिलासपूर झोन,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]