बाल संगोपन योजनेचा निधी मिळेना - अनाथ मुले वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत @शासन आपल्या दारी योजनेचा बट्ट्याबोळ

बाल संगोपन योजनेचा निधी मिळेना - अनाथ मुले वर्षभरापासून अनुदानाच्या प्रतीक्षेत
शासन आपल्या दारी योजनेचा बट्ट्याबोळ
सावली (विजय कोरेवार) - पालक गमावलेल्या मुलांना दरमहा अनुदान देण्यासाठी बालसंगोपन योजना सुरू झाली. मात्र, या योजनेचे  अनुदान जानेवारीपासून आलेले नाही. त्यामुळे या मुलांची उपेक्षा सुरू आहे. मग शासन कोणत्या योजना दारापर्यंत नेत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
   शून्य ते अठरा वयोगटातील ज्या मुलांचे दोन्ही पालक मृत आहेत अशी अनाथ मुले, तसेच ज्या मुलांचे वडील किंवा आई मृत झाले आहेत अशा मुलांना बालसंगोपन योजनेत अनुदान मिळते.  या मुलांना सुरुवातीला दरमहा अकराशे रुपये शासन अनुदान मिळत होते. ही रक्कम वाढवून आता 2 हजार 250 रुपये करण्यात आली आहे. या अनुदानासाठी  सावली तालुक्यातील 250 लाभार्त्यांनी प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र त्यांना गत जानेवारीपासून अनुदान मिळालेले नाही. जुलै महिन्यात सावली तालुक्यातील 135 प्रस्ताव मंजूर झाले तर जुलै महिन्यानंतरचे तालुक्यातील 115 प्रस्तावावर अजूनही समितीने कार्यवाही केलेली नाही. 
अनाथ व गरजू मुलांना हे पैसे शिक्षणासाठी व पालनपोषणासाठी वापरता येतील म्हणून ही योजना सुरू झाली. मात्र गतिमान म्हणणारे हे सरकार अनाथांचेही अनुदान वेळेवर द्यायला तयार नाही. एकीकडे शासन आपल्या दारी म्हणत इव्हेंट करायचे व दुसरीकडे लाभ देण्यास अनाथांनाही वाट पाहायला लावायचे धोरण दिसते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]