मुल शहरातील स्ट्रीट लाईट व हायमास्टच्या अभावामुळे वन्य प्राण्यांचे वावर, चोरी आणि अपघाताच्या प्रमाणात वाढ




आकाश कावळे तालूका प्रमुख व विशाल नागुलवार शहर प्रमुख यांचे वतीने मुल नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मा. विनोद येनुरकर यांना निवेदनाद्वारे मागणी

 मुल :- मा . मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे आदेशाने, किरणभाऊ पांडव पूर्व विदर्भ सपर्क प्रमुख व गंगाधरजी बडूरे साहेब संपर्क प्रमुख यांचे सुचनेनुसार व मा नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रपूर व मा. विनोद चांदेकर बल्लारशा विधानसभा प्रमुख यांचे मार्गदर्शनात मुल शहरातील महत्वाच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट व हायमास्टची सुविधा नसल्याने अंधारामुळे चोरी, अपघाताचे प्रमाण वाढले असून वन्य प्राण्यांचे आगमन देखील वाढल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने तात्काळ स्ट्रीट लाईट व हायमास्ट लावण्याची मागणी मुल नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मा. विनोद येनुरकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
            एलिवेट लेआउट वॉर्ड क्र. 17 श्री. अशोक बुटले ते श्री. रसूल शेख यांच्या घरापर्यंत नवीन विद्युत लाईन टाकलेली आहे. परंतु नगरपरिषद मुल ने मागील चार ते पाच वर्षापासून टाकलेल्या खांबावर  स्ट्रीट लाईट (पथदिवे ) न लावल्यामुळे संपूर्ण परिसरात सर्वत्र अंधार असल्याने वयोवृद्धापासून मजूर वर्गांना व बालकांना याचा त्रास सहन करावा लागत असून भविष्यात अंधारामुळे जीवितहानी व गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
          सदर भाग हा मुल शहराचा शेवटचा भाग असल्यामुळे रात्री अंधाराचा फायदा घेत जंगली श्वापत (प्राणी ) येत असल्याने संपूर्ण वार्डातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
      चंद्रपुर मुल महामार्गाला लागून असलेल्या कर्मवीर महाविद्यालयाचा पटांगणावर स्टीटलाइट (पथदीवे) नसल्याने शहरातील तरुण युवक युवतीना पोलीसभरती , आर्मीभरती , व अन्य प्रकरच्या शासकीय सेवेत रुजू होण्यासाठी मैदानी प्रशिक्षण घेऊन उत्तम शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांना मॉर्निंग वॉक, मैदानी खेळ व व्यायामाकरिता इतर कुठलेही चांगले ठिकाण नसल्याने शहरातील लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंतची सर्व मंडळी सकाळी साडेचार ते पाच वाजेपासुन जमा होऊन तिथेच व्यायाम व प्रशिक्षण घेत असतात. त्यामुळे प्रत्येकाला मोबाईल टॉर्च व स्ट्रीट लाईट व टॉर्च चा वापर करावा लागत असून हा परिसर निसर्गाच्या सानिध्यात  ताडोबा वन्य प्रकल्पाला लागून असल्याने  जंगली श्वापद चा वावर असतो पटांगणावर अंधार असल्याने जंगली श्वापद (प्राणी )येण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच अंधाराचा फायदा घेत काही युवा मुला मुलींचे जोडपे अश्लिल चाळे करीत असल्याची तक्रार शहरातील नागरिकांकडून होत आहे. भविष्यात या ठिकाणी अनूचित घटना घडायला काही वावगे नाही त्या करीता या पटांगणावर विद्युत खांब लावून  पथदीवे (स्टीटलाइट) लावल्यास भविष्यात होणाऱ्या दुर्घटना टाळता येऊ शकते.
 मुल, चामोर्शी, नागपूर रोडवर टी पॉईंट च्या मध्यभागी हायमास्ट लाईटची सोय नसल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी विविध अपघात होताना दिसून येत आहे. त्याकरिता मुल न. प.  त्या ठिकाणी हायमास्ट लाईटची सोय करून भविष्यात होणारे अपघात रोखावे.
 वार्ड क्रमांक 10 रामलीला भवन मार्गावर दोन विद्युत खांबावर अजून पर्यंत स्ट्रीट लाईट लावण्यात आलेले नाहीत त्यामुळे त्या मार्गावर कायम अंधार पसरलेला असतो त्यामुळे तिथे लाईटची सोय करण्यात यावी.
 मुल -चामोर्शी रोडवर विद्युत खांब असुन खांबावर स्ट्रीट लाईट (पथदिवे ) लावण्यात आलेले आहेत पण सदरचे स्ट्रीट लाईट हे प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे व दप्तर दिरंगामुळे मागील दीड ते दोन महिन्यापासून बंद आहेत सदर भागात अंदाजे 10 चे जवळपास राईस मिल असून यामध्ये काम करणारे मजुर हे शहरातील व मुल च्या जवळपासच्या भागातील आहेत रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने मजुर वर्गांना मोबाईलच्या लाईट व बॅटरी लाईट यांच्या साह्याने मार्गक्रमण करावे लागते यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी तात्काळ स्ट्रीट लाईट व हायमास्ट लावण्यात यावी. अशी मागणी शिवसेनेच्या वतीने मुल न. प. ला देण्यात आला यावेळी श्री आकाश कावळे शिवसेना तालूका प्रमुख व विशाल नागुलवार शहरप्रमुख सतीश वैरागडवार युवासेना शहरप्रमुख चेतन रामटेके शाखाप्रमुख दिवाकर झरकर राहुल मेश्राम रोहित मुत्यलवार मनोज बुटले शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]