सर्पदंश, मृत्यू ,अंधश्रद्धा व कायदा.' स्वाब संस्थेद्वारे गंगासागर हेटी येथे मार्गदर्शन कार्यक्रम.तळोधी (बा.):
     'स्वाब' नेचर केअर संस्था' चे वतीने, व गट विकास अधिकारी पंचायत समिती नागभीड यांच्या सहाय्याने तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या गंगासागर (हेटी) येथील उच्च प्रा. जिल्हा परिषद शाळेमध्ये 'साप , सर्पदंश, मृत्यू, अंधश्रद्धा व कायदा.' या विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. 
    यावेळी सापाचे बद्दल सांगत मार्गदर्शक म्हणून जीवेस सयाम यांनी सापाबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली 'सापाचे एकूण प्रकार, परिसरात आढळणारे विषारी साप कोणते, आणि  विषारी बिनविषारी साप कसे ओळखावे या बाबतीत यांच्यातील फरक सविस्तर पटवून सांगितले. व सर्पदंश होऊ नये म्हणून कोणत्या प्रकारची काळजी घेता येईल व सर्पदंश  झाल्यास काय उपाय करावे. याबाबत सांगितले. 


   यानंतर मुख्य मार्गदर्शक म्हणून संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी सापाबद्दलचे समाजातील गैरसमज, सर्पदंशाचे मुख्य कारण, सापाबद्दलच्या अंधश्रद्धा व  सर्वाधिक मृत्यूचे मुख्य कारण पटवून सांगत याबाबतीत जादूटोणाविरोधी कायद्याच्या कलम दोन (ख) व अनुसूची (नऊ) प्रमाणे कोणती कारवाई होऊ शकते याबाबत सविस्तर सांगत. "कोणत्याही प्रकारच्या सापाचा सर्पदंश झाल्यास  आधी दवाखान्यात जा, कोणत्याही नागमोती/ मांत्रिका कडे जाऊन आपला जीव गमावू नका, मंत्राने कोणताही विष उतरत नाही." असे सांगितले. पर्यावरणामध्ये वाघ, साप, पक्षी असो की मधमाशी सर्वांचे सारखेच महत्त्व असून या कार्यक्रमा मागचा उद्देश म्हणजे फक्त  लोकांमध्ये जागरूकता पसरवून सापांचे संरक्षण व सर्पदंशाचे मुळे माणसांचे जीव वाचवण्यासाठी  हाच उद्देश असल्याचे यांनी सांगितले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मन चनफने यांनी आभार व्यक्त करताना "या मार्गदर्शन कार्यक्रमामुळे मुलांच्या मनामधील सापाबद्दलची भीती , अंधश्रद्धा दूर करून, सापाबद्दल योग्य ती माहिती आमच्या सर्वांच्या मनात पुरविली व निसर्गचक्रामध्ये सापाबद्दलचे महत्त्व लक्षात आणून दिले." असे सांगून  त्या बद्दल 'स्वाब'  संस्थेचे आभार  मानून कार्यक्रमाची सांगता केली.
                    यावेळेस गंगासागर हेटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे व येथिल स्थानिक प्रियदर्शनी शाळेचे संपूर्ण विद्यार्थी शिक्षक व गावातील नागरिक उपस्थित होते. हे  यावेळेस स्वाब संस्थेचे सदस्य, नितीन भेंडाळे, गणेश गुरनूले ,  तुषार शिवनकर ,आकाश मेश्राम, शुभम निकेशर ,अक्षय फुलझले  उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]