कु. रिबिका ठाकरे हिची त्रिमित शिल्प कलेची राष्ट्रिय स्तरावर निवड

कु. रिबिका ठाकरे हिची त्रिमित शिल्प कलेची राष्ट्रिय स्तरावर निवड 

राज्यस्तरीय स्पर्धेत पारितोषीक प्राप्त शिल्पकृतीसह रिबीका


शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आणि एनसीआरटी, नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "राज्यस्तरीय कला उत्सव 2023" स्पर्धेत मूल येथील नगर परिषदेत कंत्राटी सफाई कामगाराची मुलगी कु. रिबीका बंडू ठाकरे हिने तिसरा क्रमांक मिळविल्यांने सर्वत्र तिचे अभिनंदन केले जात आहे.

नवभारत विद्यालय मुल येथील कु. रिबीका बंडू ठाकरे  हिने  "राज्यस्तरीय कला उत्सव " त्रिमित शिल्प कलेत  तृतीय क्रमांक  मिळविला आहे. राज्यातील यशामुळे तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. समग्र शिक्षा विभाग अंतर्गत शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, नवी दिल्ली आणि एनसीआरटी, नवी दिल्ली व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई आणि शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "राज्यस्तरीय कला उत्सव 2023" स्पर्धा  दिनांक  24/11/2023 महात्मा  फुले सभागृह, राज्य शैक्षणीक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे येथे आयोजित केली होती. तिचे आणि मार्गदर्शक शिक्षक श्री. बी एच सलाम सर यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ए. एच. झाडे सर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले. 


अनुष्का ठावरीची प्रतिकृतीही ठरली दखलपात्र

जिल्हास्तरीय कला उत्सव स्पर्धेत खेळणी विभागात प्रथम आलेल्या अनुष्का ठावरी हिची राज्यस्तरीय स्पर्धेतील कलाकृतीही विशेष दखलपात्र ठरली.  अनुष्का ही मूल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थीनी आहे.

अनुष्का ठावरीची कलाकृती
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]