मंत्री महोदय वाघनख नको पण वाघाला आवरा.. जिल्ह्यात चार दिवसात तीन बळी...

मंत्री महोदय वाघनख नको पण वाघाला आवरा.. जिल्ह्यात चार दिवसात तीन बळी...
    सद्या राज्यातील राजकारणात वाघनख विषय फार गाजतोय. केवळ हा विषय भारत देशातच नसून इंग्लंडपर्यंत गेलाय. जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार इंग्लन्डला वाघनख आणायला गेले परंतु ते आणता आले नाही पण करार करून आले असल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपाकडून त्यांचे सत्कारही पार पडले. शिवाजी महाराजांनी अफजलखानाला  वाघनखाने यमसदनी पाठविल्याने शिवप्रेमींच्या भावना जुळल्या आहेत. त्याचाच फायदा समोरील निवडणुकीत व्हावा या हेतूने हा खटाटोप दिसतो. नाहीतर तीन वर्षासाठी देशात वाघनखे आणून नागरिकांच्या जगण्यात कोणता विकासात्मक फरक पडणार आहे? असा प्रश्न आपसूकच येतो. 
        वाघनखावरून चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ, बिबट हिंस्त्र प्राण्यांची आठवण येणारच व नुकतेच चार दिवसात तीन शेतकऱ्यांचा बळी गेल्याने जिल्हा हादरला आहे. मागील 4-5 वर्षात वाघ- बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या चिमुकल्यांची आठवण येणारच. कारण त्यावेळी चिमुकल्यांसाठी हंबरडा फोडणारी आई अजून सावरलेली नाही. खुशी जितेंद्र हजारे सिर्सी (वय 4 वर्ष),  खुशी बंडू ठाकरे आवळगांव (वय ८ वर्ष), बाल्या देवराव ढोरे,चिचगांव (वय ८ वर्ष), बाल्या बगमारे, वांद्रा (वय ८ वर्ष), बाल्या सालोरकर, मुरपार (वय १० वर्ष),  संस्कार सतीश बुरले कापसी (वय 9 वर्ष),  हर्षल संजय कारमेंगे बोरमाळा (वय 4 वर्ष) अशी आणखी कितीतरी उदाहरणे देता नेमका आकडा कुणालाही सांगता येत नाही.. ही सारी नांवे आहेत, खेळकरी—शाळकरी मुलांची.. हसण्या—बाळगण्याच्या वयात, आपल्या हसण्यांने आई—वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यांच्या वयात वाघांची शिकार झालेत, अगदी या चार पाच वर्षाच्या कालावधीत.. या लेकरांसोबत अनेक शेतकरी, महिला, गुराखी, शेतमजूर वाघांचे खाद्य झालेत.. पण यावर सुतक कुणाला आहे? रोज मरे त्याला कोण रडे? विदर्भातील जंगलाजवळ राहणाऱ्यांचे दु:ख समजून कोण घेणार? त्यांना या लहानग्याचे दु:खाशी काय सोयर—सुतक? जंगल सोडून गावात, शेतात जाऊन वाघ- बिबट हल्ले करीत असल्याने ग्रामीण भागातील माणसाचे मृत्यू, बालक-महिलांचे मृत्यू, रानडुक्कराच्या आणि वन्यजीवांमुळे नासाडी झालेल्या शेतीच्या प्रश्नावर उपाययोजना करतील अशी आशा जिल्ह्याचे पालकमंत्री व वनमंत्री यांचेकडून असणारच. पण याबाबत काही उपाययोजना न करता फक्त भरपाईची रक्कम तेवढी वाढवून या जिल्ह्यातील विषयाला बघल देत आहेत.
      छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर मते मिळावी यासाठी वाघनख घेऊन येत आहेत. परंतु वाघाच्या हल्ल्यात रोज बळी जात असतांना काही उपाययोजना नाही. त्यामुळे वाघनखापेक्षा वाघांना आवरा अशी भावना चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी, मजूर, गुराखी, अशा ग्रामीण भागातील जनतेकडून व्यक्त होत आहे.

              विजय कोरेवार
                  प्रतिनिधी
            पब्लिक पंचनामा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]