असे झाले संविधान चौक चे नामांतरण

असे झाले संविधान चौक चे नामांतरणमूल नगर परिषदेने अनेक रस्ते, चौकांना देशातील महान व्यक्तींची, देशभक्तांची, स्वातंत्र सैनिकांची नावे दिली.  मूल प्रशासकीय भवन परिसरातील चौकाला 'पतांजली चौक' असे नामकरण करण्यात आले.  मात्र, या परिसरात सर्वच प्रशासकीय कार्यालये आहेत. येथे संविधानाला स्मरून आणि संविधानानुसार काम चालत असल्यांने, या चौकाचे नामकरण संविधान चौक करावे अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते सचिन वाळके यांनी केली.  त्यांनी सतत एक वर्ष या मागणीचा नगर परिषदेकडे पाठपुरावा केला, मात्र तत्कालीन पदाधिकारी यांनी सचिन वाळके यांचे मागणीचे निवेदन केराचे टोपलीत टाकले.

तिन वर्षापूर्वी, सचिन वाळके यांनी शहरातील संविधान प्रेमीना आवाहन करणारी पोष्ट सोशल मीडियावरून फिरविली, 26 नोव्हेंबर 2021 रोजी तहसिल कार्यालयासमोरील चौकाला संविधान चौक नामकरण करण्यांचा निर्णय झाला.  सामाजीक कार्यकर्ते विजय सिध्दावार, गौरव शामकुळे, अमीत राऊत, पंचायत समितीच्या माजी सभापती पुजा डोहणे, नगर परिषदेचे माजी सभापती मिलींद खोब्रागडे, सचिन वाळके व त्यांचे कुटूंबियासह अनेकांनी एकत्रीत येत, पतांजली चौक लिहीलेल्या फलकावरच, 'संविधान चौक' लिहीलेले पोष्टर चिकटविले.  हार घातला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकारात या चौकाचे नामकरण जनतेनेच संविधान चौक करून टाकले.

ही बाब त्यावेळच्या नगर परिषद पदाधिकार्यांना रूचली नाही, त्यांनी, पतांजली चौकाचे नामांतरण संविधान चौक असे करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचा मुख्याधिकार्यांकडे तगादा लावला.  मात्र त्यावेळचे मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांनी या पदाधिकार्यांच्या दबावात न येता, संविधान चौकचे नामांतरण कायम ठेवले.  आता येथे दरवर्षी, संविधानातील प्रास्ताविकेचे सामुहीक वाचन केले जाते. गोड पदार्थ वाटले जातात. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून फलकाला हार घातले जातात. या परिसरातील झेरॉक्स सेंटर चालविणार्यांनी, आपल्या संघटनेचे नावही 'संविधान चौक झेरॉक्स असोसिएशन' केले. सार्वजनिक ठिकाणी संविधानाचे प्रास्ताविकतेचे वाचन होणारे मूल शहरातील हे एकमेव स्थळ.  सचिन वाळके यांनी घेतलेल्या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]