फडणवीस, मुनगंटीवार यांना धमकी?

 फडणवीस, मुनगंटीवार यांना धमकी?

Devendra Fadanvis- Sudir Mungantiwar


उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना आज सोशल मीडियावरून धमकी दिल्यांने खळबळ माजली आहे.  याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने प्रसारीत केले आहे.

ही धमकी बाबा मस्की आणि त्यांची पत्नी शोभा मस्की  यांनी दिल्यांचे वृत्त आहे.  नाम. फडणवीस आणि नाम. मुनगंटीवार यांनी स्वतंत्र विदर्भाचे आंदोलन केले होते, बाबा मस्की हे कट्टर विदर्भवादी असून, वेगळ्या विदर्भासाठी त्यानी आक्रमक आंदोलन केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्याचे वन मंत्री यांच्या विषयी अपमानास्पद अश्लील शब्दात बाबाराव मस्की नामक व्यक्तीने यांनी 17नोव्हेंबर 2023 रोजी सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित करित अनावश्यक भाष्य करित शिविगाळ करित घरा पर्यंत जाऊन जिवेमारण्याची भाषा केली.

शांतता पुर्व स्थितीत सामाजिक व राजकीय स्थिती योग्य राहावी म्हणून बाबाराव मस्की यांच्या विरोधात राजुरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून त्यांच्या वर योग्य कार्यवाही करून गुन्हा व अटक करण्याची मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे वतीने केली आहे.दरम्यान गडचांदूर पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली.
विदर्भ भाजप कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष रामदास दुर्योधन यांनी गडचांदूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. गडचांदूर पोलिसांनी भादंवि कलम २९४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भविष्यात असे धाडस कोणी केल्यास धडा शिकविला जाईल, असा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.

याप्रसंगी जिल्हा भाजयुमो उपाध्यक्ष संदीप पोडे, चंद्रपूर महानगर भाजपा कामगार मोर्चाचे अध्यक्ष सुरजसिंह ठाकूर, उग्रसेन पांडे, उत्तर भारतीय मोर्चाचे सरचिटणीस डॉ. दीपक पाठक, भाजप कामगार मोर्चाचे जिल्हा सचिव योगेंद्र केवट, इंद्रजित सिंग, राजू निषाद, रवी चिल्का, नौशाद सिद्दीकी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सतिश धोटे कामगार आघाडी मौर्चा जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे, ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सदिप पारखी अनुसूचित जाती मौर्चा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव जिवणे,प्रमोदजी लांडे संजय जयपुरकर,संतोष तेलिवार आदी सह अन्य पदाधिकारी यांनी तक्रार दाखल करित मागणी केली.


सोशल मिडियावर व्हिडीओद्वारे ही धमकी दिली आहे.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]