"बेबस" हिंदी चित्रपटाच्या पोस्टर चे विमोचन व ट्रेलर प्रदर्शित
आज दी. 27 नोव्हे. 2023 रोज सोमवार ला चंद्रपूर येथे, महाराष्ट्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्यपालन व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बिग बजेट "बेबस" ह्या हिंदी  चित्रपटाच्या पोस्टर चे विमोचन करून चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. ह्या प्रसंगी श्री. चंदन सिंह चंदेल तसेच श्री. हरीश शर्मा व *बेबस हिंदी चित्रपटाचे लेखक , निर्माता व दिग्दर्शक श्री कृपाल लंजे*  व श्री. प्रभाकर भोयर भाजपा शहर अध्यक्ष, मूल श्री. संतोष वरपल्लिवार श्री. प्रफुल यलचलवार, श्री आशुतोष सादमवार, श्री. सचिन गेडाम, श्री. निलेश जंपलवार, कु.कुमुदिनी भोयर, श्री विनोद बोलीवार, सौ.ममता गोंगले, नैना खोब्रागडे, श्री.सुनील कुकुडकर, सौ. माही देशवाल, कु.करिष्मा मेश्राम, श्री.भाष्कर पिंपळे,श्री. अनिरुद्ध सादमवार,रितेश चौधरी, अमोल गेडाम, सौ. शालिनी सुटे, श्री.अविनाश पाटील,मयूर राशेट्टीवर,श्री संदीप जुलमे, व चित्रपटाची पूर्ण टीम उपस्थित होती. ह्या प्रसंगी नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सर्व प्रेक्षक तथा महाराष्ट्रातील सर्व चित्रपट प्रेमींना 12 जानेवारी 2024 ला "बेबस" हा चित्रपट  चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असून हा हृदयस्पर्शी चित्रपट बघावयास गर्दी करून चित्रपटाला घवघवीत यश द्यावे असे प्रेक्षकांना आव्हान केले तसेच हा चित्रपट आापल्या मूल शहरातील लोकल परिसरात चित्रीत केला असून ह्या चित्रपटा मध्ये मूल व विदर्भातील निष्ठावंत कलाकारांनी भूमिका साकारली असल्यामुळे हे आपण सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे असे ते आपल्या भाषणातून व्यक्त केले. प्रेक्षकांनी सुद्धा मंत्री महोदयांच्या आव्हानांना होकार दर्शविला व चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात साद दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]