वर्षा भांडारकर नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

नवभारत विद्यालय मूल येथील शिक्षिका सौ.व्ही.एस.भांडारकर मॅडम नारी शक्ती अवार्ड ने सन्मानित


चंद्रपूर.... आनंदगंगा फौंडेशन कोल्हापूर येथे राज्यातील चाळीस उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा संपन्न.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा  सौ.लेखा मिणचेकर कार्यवाहक मिणचेकर फौंडेशन. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती  सौ.साधना पाटील समुपदेशक यशवंत व्यसनमुक्ती केंद्र शिराळा..तसेच योगविश्वविक्रम वीर डाॅ.जाणवी इंगळे ह्या होत्या... कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  सागर माने प्राचार्य,   विनायक भोसले, प्रा.सौ.उर्मिला पाटील, विराट गिरी, शामराव पाटील, शामराव पाटील सर, डाॅ. यशवंत केळूस्कर,  डॉ.आनंदीसिह रावत लेखिका,  प्रसाद कार्वेकर योगगुरु हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाशने करण्यात आली.स्वागतसोहळा व पाहुण्यांच्या भाषणानंतर पुरस्कार सोहळा सुरवात झाली...
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नवभारत विद्यालय मूल येथील सौ.वर्षा भांडारकर तसेच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिमढा येथील सौ.प्रतिमा नंदेश्वर मॅडम, कु.उराडे,  यांच्या पर्यावरण, साहित्यिक , व सामाजिक या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आनंदगंगा फौंडेशन कोल्हापूर तर्फे नारी शक्ती अवार्ड 2023 देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला पुरस्कार विजेत्या महिला उपस्थित होत्या.
अतिशय प्रसन्न व आनंददायी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]