घोडाझरी नहरा मध्ये पुलात गुदमरून एका रानगव्याचा मृत्यू.( नागभीड वनपरिक्षेत्रातील घटना.)
यश कायरकर:
      ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत येणाऱ्या नागभीड वनपरिक्षेत्रातील घोडाझरी जंगलालगत, नियत क्षेत्र मांगरुळ,  घोडाझरी - खरबी मुख्य नहरामध्ये रात्री भटकताना  अकरा हजारी पुलांमध्ये पाण्यात गुदमरल्यामुळे एका नर रानगव्याचा मृत्यू झाल्याने अंदाजे एका दहा वर्षे वयाच्या नर रानगव्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती ही त्या बीटाचे वनरक्षक गतीवर असताना त्यांना निदर्शनास आल्यानंतर वन विभागाने घटनास्थळ गाठून जे.सी.बी.च्या सहाय्याने रानगव्याला पाण्याच्या बाहेर काढून घटनास्थळीच शव विच्छेदन केले व जेसीबीच्या साह्याने गड्डा करून त्या रानगव्याला तिथे  पुरण्यात आले. यावेळेस नागभीड च्या पशुधन विकास अधिकारी कुमारी ममता वानखेडे, तालुका लघु चिकित्सा नागभीड व त्यांच्या टीम द्वारे हे शवविच्छेदन करण्यात आले.
   यावेळेस श्री विवेक  करंबेकर ,मानद वन्यजीव रक्षक ब्रह्मपुरी , श्री पवन नागरे झेप निसर्ग मित्र संस्था नागभीड, व एस. बी. हजारे वनपरिक्षेत्र अधिकारी व सहाय्यक उपवनसंरक्षक, यांच्या उपस्थितीमध्ये ही कारवाई करण्यात आली .
   सदर वन्यजीव मेल्याची घटना ही  ब्रह्मपुरी वन विभागामधील आजची दुसरी घटना असून शिंदेवाही वनपरिक्षेत्रात सुद्धा विद्युत खांबावर एक एक ते दिड वर्ष वयाच्या मादा बिबट करंट लागून मृत झाल्याची घटनाही घडली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]