वनविभागाच्या कार्यालयात खेडीवासियांचा ठिय्या आंदोलन - वाघाचा व रानटी डुकरांच्या बंदोबस्ताची मागणी

वनविभागाच्या कार्यालयात खेडीवासियांचा ठिय्या आंदोलन - वाघाचा व रानटी डुकरांचा बंदोबस्ताची मागणी
सावली - खेडी येथील शेतशिवारात  धान व कापूस पिक उभे आहे. अगोदरच रानटी डुकरांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना आता वाघाने हालचाली सुरु केले धान व डुकरेसुद्धा पिकांची नासधूस करीत आहेत . त्यामुळे खेडी येथील महिला पुरुषांनी वनपरीक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
   सावली तालुक्यातील खेडी येथे धान कापणीला व कापूस काढणीला आला आहे मात्र वाघाचे दर्शन रोज होत असल्याने शेतकरी व मजूर वर्गात चांगलीच दहशत निर्माण झाली असून शेताकडे जाण्यास हिंमत होत नाही. मागील वर्षी कापूस काढत असताना खेडी येथील स्वरूपा प्रशांत येलट्टीवार हिचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेचा धसका घेतला असून  पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने गावकरी भयभीत आहेत. रानटी डुकरे शेताची मोठ्या प्रमाणात  नासधूस करीत आहेत. याबाबत अनेकदा वनविभागाला माहिती देऊनही प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्याने वनपरीक्षेत्र कार्यालयात खेडी येथील नागरिकांनी ठिय्या मांडला. वाघाचा बंदोबस्त झालाच पाहिजे, डुकरांचा बंदोबस्त झालाच पाहिजे अशा घोषणा देत कार्यालयाच्या दरवाजासमोरच ठिय्या मांडल्याने वनविभाग आदरले. उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक यांचेसोबत फोनवर बोलणी झाली. वनपरीक्षेत्र अधिकारी विरुटकर यांनी वाघाचा व डुकराचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर व पिंजरे रवाना केल्यानंतर आंदोलन मागे घेतले. मागणी पूर्ण न झाल्यास दिवाळीनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
 भटक्या विमुक्त जाती जमातीचे जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच सचिन काटपल्लीवार, अनिल स्वामी, मारोती नरेड्डीवार, परशुराम मरलावार,  राजू कंचावार, अनिल बदमवार, सुजित दंडावार, संदेश  काटपल्लीवार, धनराज अलाम, सोमेश्वर कंचावार , उपसरपंच मुक्ताबाई गर्तुलवार, नागेश ओगुवार,  डीडी बदमवार, दिनेश रामीडवार, सूर्यकांत पाडेवार, इंदिरा कटकमवार, कांताबाई नागापुरे, आदीसह शेकडो गावकरी सहभागी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]