गंभीर आजाराने स्थिरावले पण अल्प आजाराने हिरावले
राजकीय क्षेत्रात पुढाकार घेऊन सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारा नावाने 'विनोद' असला तरी सामाजिक कार्यात गंभीर असलेला जनसामान्यांसाठी नेहमीच कार्यतत्पर अशी ओळख असलेला
आमचा मित्र विनोद कामडे याचे आज अल्प आजाराने निधन झाले मनाला चटका लावणारी ही बातमी कळताच मन मानायला तयार नव्हते कारण याच विनोदने दोन वर्षापूर्वी एका जीवघेण्या आजारातून स्वतःला सावरले होते.
गंभीर आजारातून स्थिरावत असताना आज त्याचे आपल्यातून जाणे अपेक्षित नव्हते,
हाच विनोद जेव्हा गंभीर आजाराने ग्रस्त होता, तेव्हा आमच्या श्री साई मित्र परिवाराने केलेल्या विनंतीवरून मुल तालुक्यातील कित्येकांनी सामाजिक माध्यमाच्या (What's app) द्वारे आर्थिक सहकार्य केले होते. याबद्दल विनोदने श्री साई मित्र परिवार व सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.
पण आज हा तळमळीचा सामाजिक कार्यकर्ता आपल्यात नाही, हे ऐकून मन सुन्न झाले. निसर्गाच्या समोर कुणाचे चालत नाही. हेसुद्धा तेवढेच खरे!!
कामडे कुटुंबावर कोसळलेल्या या अकस्मात दुःखद प्रसंगी त्यांना हे दुःख सहन करण्यासाठी बळ प्राप्त होवो,या मनस्वी प्रार्थनेसह🙏🏻 मित्र विनोद कामडे यांस भावपूर्ण श्रद्धांजली!!💐💐

शोकाकूल: श्री साई मित्र परिवार मूल


1 टिप्पणी:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]