२४ तासाच्या आत शेतकऱ्यांना २४ तास विज पुरवठा न मिळाल्यास तीव्र रास्ता लोको आंदोलन करणार - डॉ सतीश वारजूकर चिमूर - ७४ विधानसभा समन्वयक


तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दि.३ नोव्हेंबर २०२३ चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिश वारजूकर यांनी शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन शेती ओलित करण्यासाठी शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा देण्यात यावा या करिता चिमूर वरोरा महामार्गावर  रामदेगी फाट्याजवळ वरोरा तालुक्यातील येरखेडा व गिरोला, चिमूर तालुक्यातील सावरी, माकोना खानगांव, गुजगव्हान येथील शेतकऱ्यांसोबत रास्ता रोको आंदोलन केले.
एकीकडे मोझाक या व्हायरसमुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाले तर दुसरीकडे शेतकऱ्याला थ्री फेज वीजपुरवठा दिवसा नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हवालदिल झाला आहे. कपाशीचे पीक देखील उन्हामुळे मरणागती जात असल्याचे दिसत आहे.याच सोबत धान पीक देखील पाण्या अभावी नष्ट होण्याची दाट शक्यता आहे.तेव्हा शेतकऱ्यांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

त्याकरिता रब्बी हंगामातील चना गहू या पिकांना पाणी सुधा गरजेचे असल्याने शेतकऱ्यांना रात्रीला आपल्या पिकाला पाणी करावे लागत असते तेव्हा येथील शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागत असून यात रात्री ला रानटी जनावरे, विषारी साप विंचू अश्या प्राण घ्याल प्राण्याला तोंड देत जीव मुठीत धरून पानी करावे लागत आहे. करिता शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या सोई करिता २४ तास विद्युत पुरवठा सुरळीत देण्यात यावा जर २४ तासाच्या आत शेतकऱ्याना २४ तास विज पुरवठा करू शकले नाहीतर संपूर्ण शेतकरी परत रस्त्यावर उतरून दिवसभर रास्तारोको आंदोलन करू असा ईशारा चिमूर - ७४ विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक डॉ.सातिश वारजूकर,सर्व शेतकरी यांनी उपस्थित अभियंता सिंग साहेब यांना देण्यात आला.यावेळी चंद्रपूर जिल्हा कांग्रेस कमिटी सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य गजाजन बुटके, तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, जिल्हा परिषद माजी सभापती गुणवंत कारेकर,ग्रामपंचायत सरपंच सावरी लोकेश रामटेके, माजी सरपंच ठेपाले,मंगेश मेश्राम,गोलू रामटेके,आशिष खोब्रागडे, सौरभ बुटके, पंचम रामटेके,बंडू गायकवाड, संदीप माथनकर, पकढारी माथनकर,पंढरी माथनकर,नंदलाल शेंडे,ताराचंद पाटील, ठकसेन पाटिल,रोशन खोब्रागडे,सुरेश निखाडे,व शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]