मृत्तवास्थेत नवजात अर्भक नालीत आढळला

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मृतावस्थेत असलेल्या एका नवजात अर्भकाला नालीत फेकून दिल्याची हृहद्रावक घटना आज बुधवारी १ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी चारच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुक्यातील बोडदा गावातील हनुमान मंदिरासमोरील नालीत उघडकीस आली आहे. आढळलेले नवजात अर्भक हे बालिका असून जन्मानंतर  दोन ते तीन दिवसाचे हे अर्भक असून गावातील नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्यातील बोडधा गावात आज बुधवारी सायंकाळी चारच्या सुमारास गावातील काही लोकांना हनुमान मंदिरासमोरील सांडपाणी साचलेल्या नालित नवजात अर्भक मृत्तावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती बोडधा गावात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली. लगेच भिसी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. आणि पोलिसांचा पथक घटनास्थळी दाखल झाला. पोलीसांनी नवजात अर्भकाला ताब्यात घेतले असता ते मृत्तावस्थेत होते. ती बालिका असुन पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्या महिलेची शोध मोहीम पोलिसांनी सुरू केली आहे.

अर्भक आढळून आल्यानंतर ती गावातील कुठल्यातरी महिलेचे असावे असा संशय आला होता, परंतु गावात कुणीच महिला गर्भवती नसल्याने ते अर्भक अन्य गावातील महिलेचा असावा असा संशय निर्माण केल्या जात आहे. कुणातरी बाहेरील व्यक्तींनी हे नवजात अर्भक रात्रीच नालीत आणून टाकले असावे, अशीही चर्चा आहे. आढळून आलेले अर्भक ही बालिका असल्यामुळे तिला उघड्यावर फेकण्यात आले असावे, अशीही शंका व्यक्त केली आहे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]