खेडी शेत परिसरात वाघाचा संचार - बंदोबस्त करण्याची शेतकरी, मजुरांची मागणी

खेडी शेत परिसरात वाघाचा संचार - बंदोबस्त करण्याची शेतकरी, मजुरांची मागणी
सावली - खेडी परिसरातील शेतात वाघाचे दर्शन होत असल्याने शेतातील कामे ठप्प पडली आहेत त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी भयभीत शेतकरी, मजूर वर्गाकडून करण्यात येत आहे.
     तालुक्यापासून जवळच असलेल्या खेडी परिसरात शेतीशिवाय उदरनिर्वाहाचे साधन नसून धान व कापूस पिक उभे आहे. अगोदरच रानटी डुकरांकडून मोठ्या प्रमाणात पिकांची नासधूस झाल्याने शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत असताना आता वाघाने हालचाली सुरु केले आहे. धान कापणीला व कापूस काढणीला आला आहे मात्र वाघाचे दर्शन रोज होत असल्याने शेतकरी व मजूर वर्गात चांगलीच दहशत निर्माण झाली असून शेताकडे जाण्यास हिंमत होत नाही. मागील वर्षी कापूस काढत असताना खेडी येथील स्वरूपा प्रशांत येलट्टीवार व रुद्रापूर येथील बाबुराव कांबळे  यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या घटनेचा धसका घेतला असून  पुनरावृत्ती होण्याची भीती असल्याने मजूर मिळणे अडचणीचे झाले आहे. सदर वाघ खेडी, भवराळा, राजगड, चांदली बुज. या भागात वाघ फिरत असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. वाघाचा बंदोबस्त न केल्यास गावकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]