मूलच्या अनुष्का ठावरीची राज्यस्तरावर निवडशालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कला स्पर्धेत मुल येथील नवभारत कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का ठावरे ही खेळणी विभागात जिल्ह्यात पहिली आल्याने तीची राज्यस्तरावर निवड करण्यात आली आहे.
अनुष्का ठावरी यांचे मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यालयाचे कलाशिक्षक कार्तिक नंदुरकर यांनी अनुष्काला मार्गदर्शन केले.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे वतीने, यावर्षी कला महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात शास्त्रीय गायनात कु. वैष्णवी चटारे, एकपात्री नाट्यप्रयोगात कु. कोमल त्रिपत्तीवार, खेळणी निर्मितीत कु. अनुष्का ठावरी तालुक्यात प्रथम आल्याने त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता निवड करण्यात आली होती.
चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय स्पर्धेत, खेळ विभागात कु. अनुष्का ठावरी हिने प्रथम क्रमांक मिळविल्याने तिची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. कु. वैष्णवी कटारे आणि कु. कोमल त्रिपत्तीवार यांनीही नेत्रदीपक कला सादर केली.
यशस्वी विद्यार्थिनीचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष एडवोकेट बाबासाहेब वासाडे, कार्याध्यक्ष डॉ. बोकारे, सचिव ॲड. अनिल वैरागडे यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]