ग्रामगीताचार्य पदवी समारंभ गुरुकुंज आश्रम मोझरी येथे संपन्न

           चंद्रपुर जिल्हातील मुल
शहरातील गुरुदेव सेवा मंडळ मुल जि चंद्रपुर येथील सक्रीय कार्यकर्ते मान.सुखदेव चौथाले सर, यांना अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ द्वारा संचालीत  ग्रामगीता जीवन- विकास परीक्षा श्रीक्षेत्र गुरुकुंज आश्रम , मोझरी येथे वंदनीय 
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज 
पुण्यतिथी महोत्सवी सन 2023-24 या कार्यक्रमात 
"ग्रामगीताचार्य" ही परीक्षा ऊत्तीर्ण झाल्याबद्दल  मान.पुष्पाताई बोंडे, मान.पाटील, मान.बंडोपंत बोढेकर,ग्रामगीताचार्य मान. गुलाबराव खवसे, मान.सवाई मॅडम,मान.दहीकरताई मान. जनार्दन बोथे, संस्थेचे अध्यक्ष व
मान.गमे काका , सर्वाधिकारी
याचे प्रमुख ऊपस्थितीत पार
पडला.
         कार्यक्रमाचे संचालन सचिव मान.गोपालजी कडु
यांनी केले. महाराष्ट्रातील 30
ग्रामगीताचार्य यांना  हा पुरस्कार 
मोठ्या थाटामाटात देण्यात आला. चंद्रपुर जिल्ह्यातील यावेळी तीन व्यक्तींना ग्रामगीताचार्य पदवी  सन्मानाने
देण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला असंख्य गुरुदेव भक्त प्रामुख्याने उपस्थित होते. 
          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]