मुल येथे संविधान प्रस्तावना वाचन

मुल येथे संविधान प्रस्तावना वाचन 
मुल २६/११/२०२३ 

शहरातील अत्यंत वर्दळीच्या तसेच सर्व शासकीय कार्यालये असलेल्या प्रशासकीय भवन जवळील संविधान चौक येथे ७४ व्या संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
२९ ऑगस्ट १९४७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना देशात लागू झाली असली तरी २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली होती. 
यावेळी विजय सिद्धावार, गुरु गुरनुले, प्रा. विजय लोनबले, मिलिंद खोब्रागडे, मंगेश पोटवार, सचिन वाकडे, गौरव शामकुळे, अमित राऊत, स्वाक्ष वाकडे, संदीप डोंगरे, राकेश मोहुर्ले, भोजराज गोवर्धन, निहाल गेडाम, सुशांत वाकडे, आकाश येसनकर, गणेश गुरनुले, लक्ष्मण खोब्रागडे, संजय मोहुर्ले, स्नेहदीप दहिवले, स्तव्य वाकडे, सुमेध मेश्राम, प्रा. गुलाब मोरे, विक्रांत मोहुर्ले, प्रा. टिकले, प्रा. तिवाडे, प्रा. बनकर, प्रा. गव्हारे, प्राचार्य पद्मराज लोखंडे, सुहानी मोहुर्ले आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]