विद्युत तार तुटून पडल्याने एक गाय व एक गोरा ठार.नागभिड तालुक्यातील (राजुली) बोंड येथील घटना. 
यश कायरकर (तालुका प्रतिनिधी):
            नागभीड तालुक्यातील बोंड (राजुली) येथे आज दुपारी ३ वाजताच्या दरम्यान हिवाळ्यात सुरू असलेल्या या अवकाळी पावसात गावामध्ये रस्त्यालगत बांधलेले दोन गुरे वरून गेलेला विद्युत तार तुटून त्यांच्यावर पडल्यामुळे विद्युत करंट लागून जागीच ठार झाल्याची घटना घडली.
वामन बगडे या शेतकऱ्याचे घरासमोर अमलालगत असलेल्या रोडच्या कडेला बांधलेले गुरे एक गाय व एक गोरा यांच्यावर विद्युत तार तुटून पडला त्यामुळे त्या तारेच्या स्पर्शामुळे दोन्ही बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली यामध्ये शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले. विशेष म्हणजे पाऊस सुरू असल्यामुळे व थंडीचे दिवस असल्यामुळे लहान मुलं त्या ठिकाणी खेळत नसल्याने कोणते जीवित हानी झाली नाही.
      घटनेची माहिती मिळताच विद्युत विभागाचे कर्मचारी यांनी जाऊन विद्युत प्रवाह बंद केला. व पंचनामा करण्यात आला. शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई विभागाने लवकर द्यावी अशी मागणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]