"त्या" महिला 23 दिवसापासून रस्त्यावरमूल, ता. २६: अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करावे यासह अन्य मागण्यांना घेऊन मागील 23 दिवसापासून महिला रस्त्यावर आहे. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार या महिलांनी केला आहे.

अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू करा, कोरोना प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून अंगणवाडीसेविकांना ग्रॅज्युएटी लागू करावी, अंगणवाडीसेविकांच्या रिक्त जागा भराव्या, सेवानिवृत्तीचा लाभ द्यावा, फसवेगिरी बंद करा अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या. प्रा. रमेशचंद्र दहीवडे म्हणाले, शासनकर्त्याची फसवेगिरी जादा काळ चालणार नाही.

येत्या निवडणुकीत त्यांना त्याची जागा दाखविल्याशिवाय जनता राहणार नाही. हे शासनकर्त्यांनी ध्यानात ठेवावे, असा इशारा दिला. यावेळी किशोर जामदार, भेलके यांनीही मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजेश पिंजरकर, शारदा लेनगुरे, प्रमोद गोडघाटे, विद्या निव्रड, सुशीला कर्णेवार, गुजा डोंगे, वर्षा तिजारे, मोनाली जांभुळे, कुंदा वाघमारे, ललिता चौधरी, मनीषा दयालवार, मंगला झाडे यांच्यासह अंगणवाडीसेविका सहभागी झाल्या होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]