नाल्यात मृत अवस्थेत आढळली वाघीण...




वरोरा... जगदीश पेदाम

वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या खांबाळा गावाजवळ नाल्यात अंदाजे तीन वर्षाची असलेली वाघीण मेलेल्या अवस्थेत आढळून आली असून वनविभाग, पर्यावरणप्रेमी मध्ये  मोठी खळबळ उडाली आहे....
तालुक्यातील वडगाव मुरदगाव रस्त्यावरील नाल्यामध्ये रविवारी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान एक तीन वर्षाची वाघीण मेलेली आढळून आली याची माहिती वनविभागानला मिळतात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे, बंडू धोतरे, अध्यक्ष इको-प्रो संस्था राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रतिनिधी, मुकेश भांदककर, प्रधान मुख्य वनसंरक्षक नागपूर यांचे प्रतिनिधी, विशाल मोरे अपास वन्यजीव प्रेमी यांनी घटनास्थळी भेट देत घटनास्थळ चौकशी पंचनामा करून मेलेल्या वाघिणीची पाहणी केली.
वाघाची शवविच्छेदन करण्यासाठी TTC चंद्रपूर येथे पाठवण्यात आले असून पुढील चौकशी विभागीय वनअधिकारी चंद्रपूर प्रशांत खाडे, सहाय्यक वनसंरक्षक चंद्रपूर(अतिरिक्त) घनश्याम नायगमकर,यांच्या मार्गदर्शनात वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे,डि.बी.चांभारे क्षे.स. टेमृडा, जे.के.लोणकर क्षे.स.शेगाव एस.डी. खोब्रागडे, जी.डी.केजकर, वनरक्षक एन. के. करकाडे, आदी करत असून एक वर्षांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनेमध्ये आतापर्यंत अठरा वाघांच्या मृत्यू झालेले आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]