सरस्वती ज्ञान मंदिर, नागभीड येथे महापरिनिर्वाण दिन साजरा..!!!नागभीड: सरस्वती ज्ञान मंदिर,नागभीड येथे महापरिनिर्वाण साजरा करण्यात आला.. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रेरणादायी असून अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून त्यांनी यश मिळविले असून आपल्याला आपल्या आयुष्यात मोठे ध्येय गाठायचे असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समजून घेणे फार महत्वाचे आहे असे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून मत व्यक्त केले.. शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ पानसे, सहा.शिक्षिका किरण वाडीकर, सहा.शिक्षक आशिष गोंडाने,पराग भानारकर यांनी मार्गदर्शन केले.. यावेळी वर्ग तिसरी ते सातवीच्या विदयार्थ्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला..सहा. शिक्षिका राजुरकर मॅडम यांनी भीमगीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.. सदर कार्यक्रमाला मेघा राऊत मॅडम,श्रद्धा  वाढई यांनी विशेष सहकार्य केले.. कार्यक्रमाचे संचालन आशा राजुरकर मॅडम यांनी केले तर आभार सतीश जिवतोडे सर यांनी व्यक्त केले....!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]