महिला शेतकरी वर्षा लांजेवार यांना विदर्भस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार     "चिंधिचक गावांचे नाव लौकिक" तळोधी (बा.) 
          नागभिड तालुक्यातील चिंधिचक येथिल शेतकरी महिला वर्षा तुळशीदास लांजेवार यांना शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख 125 व्या जयंती वर्षानिमित्त विदर्भस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विदर्भस्तरीय शेतकरी सन्मान सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांचे हस्ते वर्षा लांजेवार यांना सन्मानित करण्यात आले. शरद पवार संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तथा संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आयोजीत राष्ट्रीय कूषी प्रदर्शनी मध्ये विदर्भातील नऊ शेतकऱ्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील नागभिड तालुक्यातील चिंधिचक येथील वर्षा लांजेवार यांना उत्कृष्ट धान उत्पादक व उघोजक म्हणून गौरविण्यात आले. आपले शेतात कूषीविषयक नवनवीन प्रयोग करणे, नैसर्गिक उत्पादक, व शेतीपूरक जोडव्यवसाय आदी बाबतींत वर्षा लांजेवार यांचा "शेतकरी कन्या" "शेतकरी आयडॉल " व विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचाच आढावा घेवुन विदर्भस्तरीय शेतकरी सन्मान २०२३मधे शिवाजी शिक्षण संस्थेने त्यांना पुरस्कार जाहिर करून स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल-श्रिफळ, साडी आणी चांदीचा करवंदा भेट दिला. या पुरस्काराने नागभिड तालुक्यांचे नाव कूषीक्षेत्रात नावलौकिक होत असुन वर्षा लांजेवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]