अभाविप ब्रम्हपुरी चे अभ्यास वर्ग मुल मधे संपन्नअखिल भारतीय विद्यार्थी परिषद देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे विद्यार्थी संघटन आहे. अभाविप ब्रह्मपुरी जिल्हा तर्फे दि.  १ व २ डिसेंबर ला योगा भवन क्रीडा संकुल, मूल येथे दोन दिवसीय अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला होता. या दोन दिवसीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन प्रा. डॉ. खुशाल राठोड यांच्या द्वारे करण्यात आले, यामधे अभाविप परिचय, सैद्धांतिक भूमिका, अभाविप कार्यपद्धती, कार्यकर्ता व्यवहार, महिला सशक्तीकरण, आचार पद्धत्ती, महाविद्यालयीन कामकाज, प्रवास व संपर्क विविध विषयांवर चर्चा झाली. या अभ्यास वर्गात 6 स्थानावरून १० महाविद्यालयातून, २० विद्यार्थी, ६१ विद्यार्थी व ८ प्राध्यापक अशे एकूण ८९ विद्यार्थी उपस्थित होते.  यामधे संदेश उरकुडे याची जिल्हा संयोजक तर प्राध्यापक अतुल कांबळी  यांची जिल्हा प्रमुख व तळोधी - नागभिड भाग संयोजक जया महाडोळे, मूल- सावली भाग संयोजक लोचन तलमले सींदेवाही - नवरगाव भाग संयोजक म्हणून भूमिका गेडाम यांनी घोषणा करण्यात आली. यावेळी विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम , प्रांत सहमंत्री पायल किणाके, विभाग संयोजक वैदेही मुडपल्लिवर, प्रा.शशिकांत शेंडे सर व नगरातील किशोरजी कापगते,प्रवीण मोहूर्ले, व इतर नगरवासी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]