चिमूर येथील इंग्रज कालीन लोखंडी पुलाजवळ दुचाकी व एसटी बसचा अपघात

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई च्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - मुरपार मिंझरी कडून चिमूरकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एस.टी बस व दुचाकी ची समोरा - समोर धडक झाल्याने दुचाकी स्वार व मागे बसून असलेला व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांना चिमूर येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.परंतु रुग्णांची प्रकृती गंभीर आणि चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ नागपूर येथे हलविण्यात आले आहे.तसेच एस.टी. बस क्रमांक. MH31FC 3690 व दुचाकी क्रमांक.MH34 V 4146 हि दोन्ही वाहन पोलीस स्टेशन ला लावन्यात आली आहे.बस मध्ये ५० विद्यार्थी तसेच ३ ते ४ प्रवासी बसलेले होते. दुचाकी स्वार जखमी व्यक्ती हे हिरापूर येथील असल्याची माहिती समोर आली असून सदर घटना अंदाजे  सकाळी 7:00 वाजताच्या सुमारास घडली असून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.हि घटना रस्ता खराब असल्याने झाली असून याठिकाणी नेहमीच अपघात घडत असतात परंतु राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतांना दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]