अवैधरित्या रेतीचा उपसा करणाऱ्या मजुराचा ट्रॅक्टर च्या चाकात दबून मृत्यू

जंगल परिसरातुन ट्रॅक्टर द्वारे रेतीची दैनंदिन चोरी

वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.२१/१२/२०२३ ला आज पहाटेच्या ३ ते ४ वाजताच्या  सुमारास खडसंगी जवळील नवेगाव (रामदेगी) येथील आकाश सोनटक्के वय २१ वर्षे या मजूर मुलाचा रेतीची वाहतुक करीत असतांना ट्रॅक्टर च्या चाकाखाली दबून मृत्यू झाला.घटनास्थळ फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र ( FDCM ) खडसंगी या क्षेत्रातील आहे.अशी माहिती मिळाली असून मृतकास शवविच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले आहे.ट्रॅक्टर मालक खडसंगी येथील असून राजकीय पक्षाशी संबंध असल्याची माहिती आहे. अजूनही मालकाचे नाव समोर आले नसून पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे. व चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणावर भर दिवसा व रात्रोच्या वेळेस जंगल परिसर प्रादेशिक , बफर , FDCM , या जंगलातून चोरटे मार्ग तयार करून रेतीची चोरी केली जात आहे. अशा लक्षणीय बातम्या तसेच विविध निवेदने महसूल मंत्री , जिल्हाधिकारी , उपविभागीय अधिकारी , वनविभाग , महसूल अधिकारी , पोलीस प्रशासन यांना देण्यात आली. परंतु या अवैध रेती माफियांवर महसूल अधिकारी यांचे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याने याचा फायदा दैनंदिन रेती माफिया घेत असतात.या माफियांच्या डोक्यावर सत्ताधारी पक्षाच्या लोक प्रतिनिधी यांचे हात असल्याने यांचेवर अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करतांना दिसून येत आहे. हि घटना पहिली नसल्याने असेच सुरू राहिले तर शासनाचा महसूल तर बुडेलच परंतु जनतेचा शासकीय न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]