शेगाव, चिमूर,वरोरा राष्टीय ई महामार्ग चे काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन....वरोरा.. जगदीश पेंदाम

तालुक्यातील शेगाव बु येथे आज दि. १३ डिसेंबर ला बसस्थानक शेगाव बु येथे चिमूर वरोरा महामार्ग ३५३ ई चे मागील सहा वर्षांपासून अर्धवट काम त्वरित पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सकाळी १० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले.. 
या रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कित्तेकांना आपला जिव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले असून मागील २ महिन्या पासून रस्त्याचे काम करणाऱ्या एस. आर. के. कंपनी चे पूर्ण काम बंद केले, त्यामुळे स्थानिक जनतेला, प्रवाशांना, ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे यांच्या विरोधात हे आंदोलन शेगाव मधील नागरिक आणि परिसरातील त्रस्त नागरिक यांनी आयोजित केले होते. सुमारे २ तास या रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती आंदोलन पूर्ण होत पर्यंत शेगाव मधील संपूर्ण व्यापारी मंडळींनी स्वयंस्पुर्तीने आपली दुकानें बंद ठेऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शवला स्थानिक पोलीस स्टेशन चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांचे मध्यस्थीने तसेच राष्ट्रीय माहामार्ग चे उपविभागीय अभियंता बोबडे यांचे लेखी आश्वाषणा नंतर आंदोलन मागे घेण्यात आले... अभियंता बोबडे यांनी येत्या आठ दिवसात रस्त्याच्या कामावर नवीन कंपनीची नियुक्ती करुन येत्या मे महिन्याच्या शेवट पर्यंत संपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल.
शेगाव मध्ये सतत उडणाऱ्या धुळीसाठी रोज रस्त्यावर पाणी मारण्यात येईल भेंडाला जवळ रस्त्याच्या मधोमध उभी असलेली मशीन लवकरात लवकर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात येईल अशा स्वरूपाचे लेखी आश्वासन दिले या आंदोलनात शेगाव येथील नागरिक, परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]