मुल तालुक्यात जागतिक दिव्यांग समता सप्ताह साजरा


 
          
    समग्र शिक्षा, समावेशित शिक्षण, गटसाधन केंद्र ,पंचायत समिती मूलअंतर्गत, जागतिक दिव्यांग समता (समान संधी दिवस) म्हणून ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधी मध्ये संपूर्ण तालुक्यात विविध उपक्रम व स्पर्धा घेऊन साजरा शालेय स्तरावर साजरा करण्यात आला. 
   मा.वर्षा पिपरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध माध्यमांच्या शाळांमध्ये समावेशित अनेक उपक्रम घेण्यात आले.
  शाळेत जनजागृती पर कार्यक्रम घेऊन दिव्यांग दिनाचे महत्त्व समजावून सांगणे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना गृहभेट देऊन व त्यांचा सत्कार करून पालकांना व समाजाला जागृत करणे.
  शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन वेशभूषा स्पर्धा घेणे.
  शाळेत चित्रकला, रांगोळी व इतर मैदानी खेळ घेणे.
  याचा उद्देश दिव्यांग व्यक्तीनुसार समता प्रस्थापित करून, त्यांना समाजातील विविध क्षेत्रात समान संधी उपलब्ध करून देणे हा होय.
  उपक्रम यशस्वी होण्याकरिता समावेशित शिक्षण तज्ञ विवेक डांगे, संतोष सोनवणे व विशेष शिक्षक यशवंत शेट्टे, ईश्वर लोणबले, निलेश शेनमारे, स्वप्निल मेश्राम. तसेच गट साधन केंद्र मुल येथील इतर सर्व यांनी अथत परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]