शासकीय औ. प्र. संस्थेत राष्ट्रीय गणित दिवस संपन्न

शासकीय औ. प्र. संस्थेत राष्ट्रीय गणित दिवस संपन्न 

चंद्रपूर (प्रतिनिधी)- 
 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवस साजरा करण्यात आला. थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस देशभर साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमाचे आयोजन सिपेट वर्कशॉपमध्ये करण्यात आले होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ गणित चित्रकला निदेशक  तथा रासेयोचे मुख्य कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर होते. याप्रसंगी ज्येष्ठ गणित निदेशक श्री. कासर्ला, गणित चित्रकला निदेशक श्री.अजय मार्तीवार, विलासराव खेडेकर, अभय घटे, किशोर इरदंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. पूर्वा आत्राम यांनी करून श्रीनिवास रामानुजन यांच्यावरील जीवनालेख प्रस्तुत केला. तर श्री. किशोर इरदंडे यांनी श्रीनिवास रामानुजन यांनी प्रस्तुत केलेल्या गणितीय प्रमेयावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले, मानवी जीवनात गणिताला विशेष स्थान आहे. ज्यांनी गणितीय आकडेमोड कडे दुर्लक्ष केले त्यांना  जीवनात अनेक अडचणीचा सामना करावा लागला. म्हणून गणित विषयाची अकारण भीती न बाळगता, सकारात्मक दृष्टिने गणित विषयाचा अभ्यास वाढवावा. पाढे पाठांतर व गणित उदाहरणांचा सराव केला तर तुम्हाला या विषयात निश्चितपणे यश मिळेल. अलिकडे प्रत्येक स्पर्धा परीक्षेत सुध्दा गणितावर प्रश्न विचारले जातात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 
या कार्यक्रमात सर्व गणित व चित्रकला निदेशकांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
 सूत्रसंचालन  गौरव ठाकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. सुवर्णा कातकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  निदेशक लांडगे, खोब्रागडे, कोठारकर, भोंगळे,कु. माकोडे लोनगाडगे, रासेयो स्वयंसेवक रिया पिपरीकर,  कोमल बावरे ,आदित्य विश्वकर्मा,  परवेश कुरेशी,  अरहम शेख,  हर्षल शिवणकर, रोहित साळवे, अभिषेक धाबेकर ,अनुज ठाकुर, गणेश ठाकरे, अनिल कुचनकर, दर्शन गद्देकार , सुशांत गाताडे ,पारस खोब्रागडे, सरोज साहू, वर्षा तोटावार, सुरज राऊत ,अर्पिता घागरगुंडे, मनीषा कालसर्पे ,अदिती तोंडरे, बबली नगराळे आदींनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]