ग्राम फुलझरी – एक सक्षम ग्रामसभा

ग्राम फुलझरी – एक सक्षम ग्रामसभासामुहिक वनहक्क प्राप्त असलेल्या गावांमध्ये वन हक्क कायदा लागू करण्यासाठी ग्रामसभा सक्षमीकरण हा एक महत्त्वाचा पैलू आहे. चंद्रपुर पासून ३५ किलोमीटर अंतरावर वसलेले मूल तालुक्यातील जानळा ग्रामपंचायत हद्दीतील ताडोबा घनदाट जंगलात वसलेले सामुहिक वन हक्क प्राप्त गाव फूलझरी एक सक्षम ग्रामसभा म्हणून उदयास येत आहे.  वन हक्क कायदा स्थानिक आणि जंगलात राहणार्‍या समुदायांचे जमीन आणि त्यांच्याद्वारे पारंपारिकपणे वापरल्या जाणार्‍या संसाधनांवर अधिकार ओळखला जातो . ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ सदस्य असलेली ग्रामसभा, ज्यांना आदिवासी आणि जंगलात राहणार्‍या समुदायांशी संबंधित त्यांच्या पारंपारिक वनजमिनी आणि संसाधनांवर निर्णय घेण्याचा अधिकार आहे. ग्रामसभा म्हणजे वनसंपदेचा वापर आणि व्यवस्थापन याबाबत निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारी ग्रामसभा.हीच बाब ओळखुन फूलझरी ग्रामस्थानी वन हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी  गावांमध्ये ग्रामसभेचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे सुनिश्चित करते की वनसंपदेबाबत निर्णय घेण्याची शक्ती स्थानिक समुदायांच्या हातात राहते जे परंपरेने त्यांच्या उदरनिर्वाहासाठी आणि उपजीविकेसाठी या संसाधनांवर अवलंबून आहेत.
त्यासाठी गावामध्ये टाटा सामाजिक संस्थान, मुंबई च्या प्रतिनिधींनीच्या वतीने सर्वप्रथम वन हक्क कायद्याची मूळ माहिती देवून सामुहिक वनहक्क व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आणि याच समितीच्या माध्यमातून पुढे  ग्रामसभेच्या सक्षमीकरणामध्ये गावातील सभासदांना आवश्यक ज्ञान, प्रशिक्षण आणि क्षमता निर्माण प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये त्यांना वन हक्क कायदा  अंतर्गत त्यांच्या अधिकारांबद्दल शिक्षित करणे, कायद्याच्या तरतुदींची अंमलबजावणी आणि देखरेख करण्यात त्यांची भूमिका आणि वन व्यवस्थापनाचे महत्त्व समजून घेत आहे .
शिवाय, ग्रामसभेला वनजमीन ओळख, दाव्यांची पडताळणी आणि वैयक्तिक आणि सामुदायिक वन हक्क प्रदान करण्याच्या प्रक्रियेत प्रभावीपणे सहभागी होण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. स्थानिक समुदायांचे कल्याण आणि उपजीविका सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करून वनसंपत्तीचा वापर, संवर्धन, संरक्षण आणि व्यवस्थापन याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला असावा यासाठी ग्रामसभा फूलझरी आजही संघर्ष करण्यास सक्षम आहे .
ग्रामसभेच्या सक्षमीकरणामध्ये निर्णय प्रक्रियेत महिला आणि समाजातील उपेक्षित घटकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देणे आणि सक्षम करणे देखील समाविष्ट आवश्यक होते . वनसंपत्तीच्या व्यवस्थापनात त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण होईल याची खात्री करणे आवश्यक आहे.ग्रामसभेच्या विविध समितीत महिला सदस्यांना ग्रामसभेद्वारा  सहभागी वाढवण्यात आला. ग्रामसभेला तांत्रिक, आर्थिक आणि क्षमता-निर्माण सहाय्य मिळविण्यासाठी सरकारी संस्था, टाटा सामाजिक संस्थान, मुंबई  आणि इतर स्टेकहोल्डर यांच्याशी सहकार्य मिळणे आवश्यक आहे. हे उपजीविका कार्यक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये, पर्यायी उत्पन्नाच्या स्त्रोतांचा विकास आणि संवर्धन उपक्रमांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करू शकते.
एकूणच वनहक्क प्राप्त ग्रामसभा असली तरीही मागील ५० वर्षापासून फुलझरी गावात एकदाही बस आली नाही. त्यामुळे गावातील लहान मुला मुलींना बाहेर शिकणासाठी ठेवाव लागत आल्यामुळे ग्रामसभा फूलझरी बस सेवा सुरू व्हावी म्हणून सतत पाठपुरावा केला, जेव्हा रस्ता बस जाणे योग्य नाही असे कारण आले तेव्हा शासनाची वाट न बघता, फुलझरी ग्रामस्थ रस्ता दुरस्ती साठी समोर येते. ग्रामसभा फूलझरी ही फक्त वन हक्का साठीच एकत्रित आलेली  ग्रामसभा नसून सामाजिक सलोखा व एकता याच उत्तम उदाहरण म्हणजे एकही दलित समाजातील घर नसतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती येथे मोठ्या उत्साहात इतक्या वर्षा नंतर पहिल्यांदा साजरी करण्यात आली  आणि त्यासाठी गावला सन्मानितसुद्धा करण्यात आले. २३३  लोकांची  ६४ कुटुंबांनी  वसलेली या फूलझरी गावाची ग्राम सभेत कोणत्याही नोटिस शिवाय केवळ तीनदा घंटी नांद करून गावतील प्रौढच नाही तर लहान मुल सुद्धा सहभागी होतात आणि येथे होणारा निर्णय बहुमतांनी नसून सर्व सहमतीने होतो, तेव्हा जरी इतिहासात वण ग्राम म्हणून नोंद असलेले हे वणहक्क प्राप्त गाव जिल्हाच्या नाकाशात दिसत नसले, तरीही मागील एक वर्षाच्या कालावधीत प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून गावातील विविध लोकांचे प्रलंबित राशन कार्ड, जात प्रमाणपत्र, निराधार, उत्पादन प्रमाणपत्र इ. सामाजिक हक्क तालुका व जिल्हा प्रशासन जेव्हा गावात महसूल सप्ताह निमित्त वाटप करत तेव्हा ग्रामसभेची क्षमतेची ओळख हीच ग्रामसभा करून देते, मोह पुरी आणि मोह चटणीची सुद्धा भुरळ पाडून महिलांच्या पुढाकाराने एक पाऊल पुढे टाकत तालुका, जिल्हा आणि राज्यात सुद्धा विविध ठिकाणी आपली ओळख हीच ग्रामसभा करत आहे. ग्रामसभा फुलझरी  ही  जिल्ह्यात आपल वेगळ अस्तित्व निर्माण करून शासन, प्रशासन व जन माणसात एक सक्षम ग्रामसभा ते सामुहिक वन हक्क प्राप्त यशस्वी ग्राम सभा म्हणून उदयास येईल यात कोणतेही शंका नाही. 
 


                                                                                              
                                                                                                  नितीन ठाकरे 
                                                                                          टाटा सामाजिक सामाजिक संस्थान, चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]