पोलीसाची मूलच्या माजी नगरसेवकासोबत झटापटमुल पोलिसाची माजी नगरसेवकासोबत झटापट, या झटापटीत, झोंबाझोंबीत चे नखाचे ओरबडे माजी नगरसेवक बाबा अझीमच्या गालावर स्पष्टपणे दिसून येत आहे. या गालावरील जखमेनेच ही घटना उघडकीस आली आहे.
रस्त्यावर पार्किंग केलेले वाहन बाजूला करण्याची वाहन मालक पोलिसांना सूचना करणे मूलच्या एका माजी नगरसेवकास चांगलेच अडचणीचे ठरले. सुधीर उईके हे पोलिसाचे नाव, तर बाबा अजीम हे माजी नगरसेवक आहे.
25 डिसेंबर रोजी रस्त्यावर वाहन असल्याने मूलचे माजी नगरसेवक बाबा अझीम यांनी मुल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुधीर उईके यांना वाहन बाजूला करण्याची सूचना केली. यावरून दोघात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी पोलीस विभागात असलेले सुधीर उईके हे सिवील ड्रेस वर असल्याने ते पोलीस असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे बाबा अझीम यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबतची माहिती ठाणेदार परतेकी यांना देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले मात्र ठाणेदारांची भेट न झाल्याने, ते परत आलेत.
दिनांक २६ डिसेंबर रोजी बाबा अझीम यांना पोलीस ठाण्यात, ठाणेदार बोलवित असल्याचा निरोप मिळाला, बाबा अझीम हे पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची तयारी करीत असतानाच डीबी पथकातील शफीक शेख (६४८), बाबा अझीम सोबत वाद घालणारे पोलिस सुधीर उईके, व इतर दोन पोलिस पोलीस वाहन घेऊन बाबा अझीमच्या घरी आले, यावेळी आपण कपडे बदलून पोलीस स्टेशनमध्ये येत आहोत असे बाबा अझीम यांनी सांगितले मात्र पोलिसांनी आपल्या सोबतच गाडीमध्ये बसा असा आग्रह करू लागले. पोलीस स्टेशन मध्ये येण्यावरून वाद झाल्याने माजी नगरसेवक आणि पोलिसात झटापट झाली. यात बाबा अझीम यांचे गालावर नखाने ओरबडल्याचे स्पष्ट जखमा दिसत आहे.
अखेर बाबा अझीम हे पोलीस स्टेशन येथे गेले असता तिथे त्यांचे विरोधात तक्रार देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले. मात्र या घटनेमागील नेमकी बाब वरिष्ठ पोलिसांच्या लक्षात आल्याने, त्याचवेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनीही आपण अन्याय केल्यास माहोल उभा करू अशी भूमिका घेतल्याने, पोलिसांनी दोघांच्या तक्रारी न घेता दोघांकडूनही माफीनामे लिहून घेतल्याची विश्वासनीय माहिती आहे.
या घटनेबाबत मूल पोलिसांना माहिती विचारली असता, स्टेशन डायरीत अंमलदाराने माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांची भूमिका नेमकी काय? हे समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांचे कार्यालयीन दूरध्वनी (०७१७४२२०२७) न उचलल्याने याबाबतची स्पष्टता होऊ शकली नाही. या प्रकरणात अधिकृत तक्रार झालेली नसताना, गुन्हा दाखल झालेला नसताना, चार पोलीस एका माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी कसे आले होते? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

मुल पोलिसाची माजी नगरसेवकासोबत झटापट, या झटापटीत, झोंबाझोंबीत चे नखाचे ओरबडे माजी नगरसेवक बाबा अझीमच्या गालावर स्पष्टपणे दिसून येत आहे. या गालावरील जखमेनेच ही घटना उघडकीस आली आहे. रस्त्यावर पार्किंग केलेले वाहन बाजूला करण्याची वाहन मालक पोलिसांना सूचना करणे मूलच्या एका माजी नगरसेवकास चांगलेच अडचणीचे ठरले. सुधीर उईके हे पोलिसाचे नाव, तर बाबा अजीम हे माजी नगरसेवक आहे. 25 डिसेंबर रोजी रस्त्यावर वाहन असल्याने मूलचे माजी नगरसेवक बाबा अझीम यांनी मुल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सुधीर उईके यांना वाहन बाजूला करण्याची सूचना केली. यावरून दोघात चांगलीच बाचाबाची झाली. यावेळी पोलीस विभागात असलेले सुधीर उईके हे सिवील ड्रेस वर असल्याने ते पोलीस असल्याचे आपल्याला माहिती नसल्याचे बाबा अझीम यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. याबाबतची माहिती ठाणेदार परतेकी यांना देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले मात्र ठाणेदारांची भेट न झाल्याने, ते परत आलेत. दिनांक २६ डिसेंबर रोजी बाबा अझीम यांना पोलीस ठाण्यात, ठाणेदार बोलवित असल्याचा निरोप मिळाला, बाबा अझीम हे पोलीस स्टेशन मध्ये जाण्याची तयारी करीत असतानाच डीबी पथकातील शफीक शेख (६४८), बाबा अझीम सोबत वाद घालणारे पोलिस सुधीर उईके, व इतर दोन पोलिस पोलीस वाहन घेऊन बाबा अझीमच्या घरी आले, यावेळी आपण कपडे बदलून पोलीस स्टेशनमध्ये येत आहोत असे बाबा अझीम यांनी सांगितले मात्र पोलिसांनी आपल्या सोबतच गाडीमध्ये बसा असा आग्रह करू लागले. पोलीस स्टेशन मध्ये येण्यावरून वाद झाल्याने माजी नगरसेवक आणि पोलिसात झटापट झाली. यात बाबा अझीम यांचे गालावर नखाने ओरबडल्याचे स्पष्ट जखमा दिसत आहे. अखेर बाबा अझीम हे पोलीस स्टेशन येथे गेले असता तिथे त्यांचे विरोधात तक्रार देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून आले. मात्र या घटनेमागील नेमकी बाब वरिष्ठ पोलिसांच्या लक्षात आल्याने, त्याचवेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनीही आपण अन्याय केल्यास माहोल उभा करू अशी भूमिका घेतल्याने, पोलिसांनी दोघांच्या तक्रारी न घेता दोघांकडूनही माफीनामे लिहून घेतल्याची विश्वासनीय माहिती आहे. या घटनेबाबत मूल पोलिसांना माहिती विचारली असता, स्टेशन डायरीत अंमलदाराने माहिती देण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांची भूमिका नेमकी काय? हे समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांचे कार्यालयीन दूरध्वनी (०७१७४२२०२७) न उचलल्याने याबाबतची स्पष्टता होऊ शकली नाही. या प्रकरणात अधिकृत तक्रार झालेली नसताना, गुन्हा दाखल झालेला नसताना, चार पोलीस एका माजी नगरसेवकाच्या घरी जाऊन त्याला पोलीस स्टेशनमध्ये नेण्यासाठी कसे आले होते? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]