खड्डे चुकविण्याचा नादात एस टी बस उतरली राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई खाली

चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावरील घटना

मोठी हानी होता - होता टळली

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - चिमूर वरून २२ किमी अंतरावर असलेल्या गुजगव्हन आणि राळेगाव च्या मधोमध राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे अनेक वर्षांपासून काम सुरू असून ते काम थंड बस्त्यात असल्याने दैनंदिन जनतेला अपघातास सामोरे जावे लागत आहे. कालच दुचाकी खड्डे चुकवीत एस.टी.बस ला धडकल्याने चालक तसेच दुचाकी स्वार यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. अशातच हि दुसरी घटना प्रवास्यांनी भरून असलेली बस क्रमांक MH31 FC 3690 खड्डे चुकविण्याच्या नादात राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई खाली उतरली यामध्ये प्रवाश्यांना कसलीही दुखापत झाली नसून या महामार्गाचे काम लवकरात - लवकर पूर्ण करण्यात यावे अशी जनतेकडून  मागणी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]