पारडपार येथे रोड कंत्राटदार द्वारे मोठया प्रमाणात अवैधरित्या मुरमाचे उत्खनन सुरु

महसुल विभाग कार्यवाही करणार का ?

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्यातील मौजा पारडपार येथे रोड कंत्राटदार द्वारे मोठ्या प्रमाणात अवैध मुरमाचा उत्खनन सुरू असुन महसुल विभाग ठंडी मुळे झोपा घेत आहे. या अवैधरित्या मुरमाच्या उत्खनन करणाऱ्या कंत्राटदाराला महसुल विभागाचा आर्शिवाद तर नाही ना..?
पारडपार-कळमगाव रोड चे काम सुरू असुन त्या रोड ला लागणारा मुरूम हा पारडपार येथुन नेला जात आहे.हजारो ब्रास अवैध मुरुम कंत्राटदार रोड च्या कामासाठी खुलेआम वापर करीत आहे. याकडे चिमुर तहसील चे महसुल विभाग पुर्ण पने दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे.येवड्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन रोडचे कंत्राटदार करीत असेल तर जिल्हा अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देऊन कंत्राटदारावर मोठी कार्यवाही करून त्यांचा लायसन्स रद्द करून महसुल विभागाचा दंड आकारण्यात यावा.जेने करून इतर कंत्राटदाराची अश्या प्रकार अवैध गौण खनिज उत्खननाचा वापर करण्याची हिम्मत होणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]