डॉ. रविंद्र होळी तहसिलदार झाले नसते तर?

डॉ. रविंद्र होळी तहसिलदार झाले नसते तर?मूल (प्रतिनिधी)

मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी तहसिलदार झाले नसते तर? तर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केला असता!, 'तुम्ही नौकरीत नसते तर काय केले असते? या प्रश्नावर त्यांनी 'वैद्यकीय व्यवसाय केला असता' असे उत्तर दिले.  प्रेस क्लब मूलच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'मीट द प्रेस' कार्यक्रमात तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी आपल्या आयुष्यातील अनेक पैलूवर भाष्य केले. अनेक प्रश्नांना मनमोकळे होत उत्तरे दिली.

प्रेस क्लबच्या वतीने शहरातील धोरणात्मक बदल घडविणार्यां व्यक्तीमत्वांना बोलके करण्यासाठी 'मीट द प्रेस'ची सुरूवात मूलचे तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांचे हस्ते करण्यात आली.  प्रेस क्लबच्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत करीत, असे उपक्रम राबविणारे ही पहिलीच पत्रकार संघटना असल्यांचे मत त्यांनी यावेळी मत व्यक्त केले.

'गोटूल ते महसूल' हा प्रवास कसा झाला? या प्रश्नावर बोलतांना, त्यांनी आपले शालेय शिक्षण कारवाफा येथे व 12 वी पर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे झाल्यांचे सांगत, पुढील शिक्षण मुंबई येथे घेतल्याची माहिती दिली.  आपले वडिल केवळ 4 थी पर्यंत शिकले असले तरी, आम्ही भावंड खूप शिकून मोठे झालो पाहीजे यासाठी सतत ते मार्गदर्शन करीत, आजपर्यंतच्या प्रवासात आपल्या वडिलांचेच योगदान असल्यांचे सांगत, वडिलांच्या आठवणीने ते भावूकही झालेत.

वैद्यकीय शिक्षणानंतर, डॉ. होळी हे युपीएससी करीता दिल्लीत गेलेत.  तीथे चार वर्ष युपीएससीची तयारी झाली मात्र त्यात अपेक्षीत यश न मिळाल्यांने परत गावाकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचे हेतूने परत आलेत. 2011—2012 मध्ये एमपीएससी ची परिक्षा उत्तीर्ण होवून थेट तहसिलदार म्हणून निवड झाल्यांने, वैद्यकीय व्यवसाय बाजूला राहीले आणि महसूल विभागात कार्यरत झाले असल्यांची माहीती ​त्यांनी दिली.

तहसिलदार म्हणून कार्य करीत असतांना, आदिवासींना, कुळांना त्यांचे जमिनीचे अधिकार, आदिवासींच्या जमिनीचे प्रत्यार्पण करण्याची संधी मिळाली हा आपल्यासाठी महत्वाचे असल्यांची प्रांजळ कबुली त्यांनी दिली. आपल्या लहान भावाचा झालेला मृत्यू हा आपल्यासाठीचा पहिला दु:खद प्रसंग असल्यांचेही त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात माहीती दिली.

तहसिलदार म्हणून कार्य करताना अनेक कार्यात राज्यातील पाच तहसिल मध्ये आपली मूल तहसिल असल्यांचे त्यांनी अभिमानाने सांगीतले.  संजय गांधी निराधार योजना, रेशन वाटपात जिल्हयात सर्वाधिक लाभार्थी मूल तालुक्यातील असल्यांचीही माहीती देत, सामाजीक दायीत्व  जोपासल्यांचा आनंद मिळत असल्याचे सांगितले.

शेती करण्यात आपल्याला बालपणापासून आवड असल्यांचे सांगत, संघटीत झाल्याशिवाय धान उत्पादकांना न्याय मिळणार नाही याकडे डॉ. होळी यांनी लक्ष वेधले. मूल तालुक्यात एका शेतकर्यांकडे सरासरी 1 एकर शेती असल्यांने, एवढया कमी आकाराची शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायद्याची नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.  आपल्या कार्यकाळात 4500 चे वर संयुक्त 7/12 मधून स्वतंत्र 7/12 केले असल्यांचीही माहीती त्यांनी दिली.  सरासरी कमी दिवसांत फेरफार करणारे तहसिल कार्यालयात मूल तालुका राज्यात आघाडीवर असल्याची माहीती त्यांनी एका उत्तरात दिली.  भविष्यात निवृत्तीनंतर आपण मेडिटेशन करणार असल्याचीही त्यांनी माहीती दिली.

मीट द प्रेसचे संचालन धर्मेद्र सुत्रपवार यांनी केले, प्रास्ताविक दीपक देशपांडे यांनी केले तर पत्रकारांचा परिचय अमीत राऊत यांनी करून दिला.  आभार प्रदर्शन विजय सिध्दावार यांनी केले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]