समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत दिव्यांग समता दिन सप्ताह साजरा
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिखली, येथे समावेशित शिक्षण उपक्रम अंतर्गत दिव्यांग समता सप्ताह दरम्यान मा.वर्षा पिपरे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मुल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 
    विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांन सोबत शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व समान संधी देणे, दिव्यांग विद्यार्थ्यांन सोबत कोणताही भेदभाव होऊ नये, पालकांन मध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ नये, सर्व दिव्यांग जणांना सामान्य प्रमाणे जीवन शैली जगता येईल या बाबत प्रसार व प्रचार करणे यासाठी ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिवसा पासुन ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत संपूर्ण तालुक्यात शाळा स्तरावर दिव्यांग समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 
   या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. जयश्री गुज्जनवार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मुल, प्रमुख मार्गदर्शक श्री वासुदेव आत्राम केंद्र प्रमुख चिखली, श्री विवेक डांगे तालुका समन्वयक श्री गेडाम सर मुख्याध्यापक तर प्रमुख पाहुणे श्री संतोष सोनवणे तालुका समन्वयक, श्री ईश्वर लोनबले विशेष शिक्षक, श्री निलेश शेणमारे विशेष शिक्षक, श्री स्वप्निल मेश्राम विशेष शिक्षक हे उपस्थित होते. 
  कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलित करून लुईस ब्रेल व डॉ. हेलन किलर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला  अर्पण करण्यात आले.तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांन पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी   श्री डांगे सर यांनी आपल्या मार्गदर्शनात  दिव्यांगाचे हक्क व अधिकार, समता व समानता या विषयावर लक्ष वेधून सखोल विचार व्यक्त केले, मा. आत्राम सर केंद्र प्रमुख यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांन सोबत शाळेत किंवा गावात भेदभाव करु नये. त्यांच्या अडचणी व समस्या लक्षात घेऊन मदत करावी तर अध्यक्षीय भाषणात मा. सौ. जयश्री गुज्जनवार शिक्षण विस्तार अधिकारी यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांन संधी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. आपण त्यांच्या कडे मित्रत्वाच्या भावनेने बघा, भेदभाव करु नका, त्यांना आपले म्हणून स्विकार केला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्य बाबतीत कोणताही न्युनगंड बाळगू नये, तसेच शिक्षकांनी सुध्दा दिव्यांग विद्यार्थ्यांन कडे विशेष लक्ष दिले पाहिजे असे मार्गदर्शनात सांगितले. 
  या कार्यक्रम प्रसंगी शाळेत चित्रकला, रांगोळी, फुगा - ग्लास असे स्पर्धा घेण्यात आले व प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांना भेट वस्तू देऊन गौरवण्यात आले. 
    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री ईश्वर लोनबले सर विशेष शिक्षक, सुत्रसंचालन श्री कवीराज मानकर सर तर सर्व उपस्थितांचे आभार श्री तुमराव सर यांनी मानले. 
 या कार्यक्रमाच्या यशा करीता शाळेचे साहाय्यक शिक्षक श्री महावादीवार सर, श्री गेडाम सर, श्री शिडाम सर, सौ. कुकुडकर मॅडम यांनी परीश्रम घेतले, तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.        

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]