शिक्षणा शिवाय सर्वांगीण विकास होत नाही - डॉ.सतिश वारजूकर

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर तालुक्यातील माना आदिम जमात मंडळ मालेवाडा यांच्या सयुक्त विद्यमाने नागदिवाळी महोत्सव स्नेहमीलन सोहळा तथा नूतनवर्षाभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ७४ - चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ. सतिशभाऊ वारजूकर,चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष डॉ. विजयजी गावंडे, जेष्ठ नेते केशवजी वरखडे, पत्रुजी दडमल,बंडू बारेकर, दिगांबर दडमल,बंडूभाऊ घोडमारे, जांबूळे , व समस्त समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमा दरम्यान समाज बांधवानी कार्यक्रम घेण्यासाठी व्यासपीठाची मागणी केली असता कसलाही विलंब न करता व्यासपिठाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. समाज बांधवानी डॉ. सतिशभाऊ वारजुकर यांचे आभार मानले. डॉ. सतिश वारजूकर यांनी मार्गदर्शन करतांना म्हणाले शिक्षणा शिवाय सर्वांगीण विकास होत नाही, त्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे आहे. प्रत्येकाला समान बुद्धी असते म्हणून प्रत्येकाने त्या बुद्धीचा वापर करून स्वतःची प्रगती साधावी. शिक्षण व पुस्तक वाचन यामुळे बुद्धी प्रगल्भ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते की मानवाचे जीवनाचे अंतिम ध्येय हे त्यांच्या बुद्धीचा विकास कसा होईल यावर असले पाहिजे. कारण जगात जे लोक हाताने काम करतात फक्त आपले पोट भरतात आणि जे लोक बुद्धी ने मेहनत करतात ते चैनीचे जीवन जगत असतात म्हणून थोर महापुरुषांचे विचार अंगी कारणे काळाची गरज आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]