विनोद कामडेच्या मृत्यूस "हे" जबाबदार काँग्रेसचा आरोपग्रामिण रुग्णालय मूल येथील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्याच्या दुर्लक्षपणामुळे विनोद कामडे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करून, संबधितांवर कारवाई करावी अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. कॉेग्रेसचे जिल्हा महासचिव तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचेकडे तसे निवेदन देवून चौकशीची मागणी केली आहे.
मूल नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनोद कामडे यांना दिनांक 30/11/2023 ला अचानक पोटामध्ये दुखू लागले त्यांना पहाटे ५.०० वाजता ग्रामीण रूग्णालय मूल येथे उपचार दाखल केले असता त्यांना 12.00 वाजेपर्यंत भरती ठेवलं, दुपारी 12.00 वाजता त्यांना डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करून घरी पाठविले मृतक विनोद कामडे यांच्या पोटाच्या तीव्र वेदना होत असताना त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूरला रेफार करण्याऐवजी एसिडिटीचा आहे सांगून थातुरमातूर उपचार केला. तीव्र वेदना असहृय त्यांना परत दुपारी 4 वाजता ग्रामिण रूग्णालयात भरती करण्यात आले, मात्र त्रास अधिक असल्यांने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. चंद्रपूरला जातानाच रस्त्यातच विनोद कामडे यांची प्राणज्योत मावळली. मूल ग्रामिण रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचार्‍यांने चुकीचा उपचार केले, सकाळीच रेफर केले असते व वेळेवर रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली असती तर विनोद कामडे यांचा जीव गेला नसता असे निवेदनातून रत्नावार म्हटंले आहे. डॉक्टर व कर्मचार्‍यांच्या निष्काळजीपणामुळेच विनोद कामडे यांचा जीव गेल्याचा आमचा स्पष्ट आरोप असून याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रत्नावार यांनी केली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषीवर कठोर कारवाई केली नाही तर या विरोधात ग्रामिण रूग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही रत्नावार यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]