कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हमीभाव केंद्राचा शुभारंभ
    मुल -  कृषी उत्पन्न बाजार समिती मुल येथे हमीभाव धान खरेदी केंद्राचा शुभारंभ  बाजार समितीमध्ये करण्यात आला असून  शुभारंभ प्रसंगी तालुक्यातील चीमढा येथील शेतकरी महादेव नागोशे  यांनी समितीमध्ये आणलेल्या धान  खरेदीचा  शुभारंभ बाजार समिती संचालक श्री. बरडे  यांचे शुभहस्ते  वजन व काट्याची पूजा करुन  श्रीफळ फोडून करण्यात आली. काँग्रेसचे नेते चंद्रपूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे मार्गदर्शनात  शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करीत आहेत. शुभारंभ प्रसंगी बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार , संचालक अखिल गांगरेड्डीवार, संदीप कारमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, सचिव अजय घटावार, यांचेसह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.                  बाजार समिती मध्ये आलेल्या           धानाला  योग्यही भाव समस्त शेतकऱ्यांना मिळऊन देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार असल्याचे सभापती राकेश रत्नावार यांनी शेतकऱ्यांसमोर सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]