काम न करताच दिले बिल-वादग्रस्त ग्राम विकास अधिकार्‍यास दिली पदोन्नती

काम पूर्ण होण्याआधीच दिले पूर्ण बील
मारोडाचे ग्राम विकास अधिकार्यांचा प्रताप

केवळ खांब उभे असलेले गोवर्धन प्रोजेक्ट

मारोडा ग्राम पंचायत अंतर्गत गोवर्धन प्रोजेक्टचे कामाला नेमकी सुरूवात झाली असतांना, काम पूर्ण होण्याआधीच बिलाचे वितरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विनोद मेश्राम हे मारोडा येथे ग्राम विकास अधिकारी पदावर कार्यरत असतांना, केलेला कारनामा आता चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला आहे. काम पूर्ण होण्याआधीच बिल काढणारे विनोद मेश्राम आता पदोन्नतीने मूल पंचायत समितीत विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहे.
याबाबत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी व आताचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. मेश्राम यांचेशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता,
''मारोडा गोवर्धन प्रोजेक्ट हे मुख्य कार्यपालन अधिकारी चंद्रपूर यांचे ड्रिम प्रोजेक्ट आहे. तातडीने ते पूर्ण होणे आवश्यक होते, एमएसईबी ला निधी दिला असता तर, त्यांनी ते लवकर केले नसते, त्यामुळे या कामाचा अनुभव असलेल्या खाजगी कंत्राटदाराची नेमणूक करून, कामाचे बिल दिले.''
असे मत व्यक्त केले. एमएसईबी या शासकीय यंत्रणेवर विश्वास न ठेवता खाजगी व्यक्तीवर विश्वास कसा ठेवला? या प्रश्नावर श्री. मेश्राम यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. काम पूर्ण होण्याचे आधीच बिल का अदा केले? यावरही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. बिल देण्याआधी कामाचे मेजरमेंट होते, एमबी झाल्यानंतर बिल अदा केले जाते, असे असतांना काम पूर्ण होण्याआधीच, कामाची गुणवत्ता न तपासता बिल कसे दिले? यावरही श्री. मेश्राम यांनी उत्तर दिले नाही.
गोवर्धन प्रोजेक्ट हे 4,60,000/— (चार लाख साठ हजार) किमंतीचे आहे. यातील 4,41,288/— (चार लाख एकेचाळीस हजार दोनशे अठ्यानंशी रूपये) खाजगी व्यक्तीस काम होण्यापूर्वीच दिले असून, केवळ सिक्युरिटी रक्कम तेवढी शिल्लक ठेवली आहे.
मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार, मारोडा येथे ग्राम विकास अधिकारी असतांना, त्यांची मूल येथे विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाली. आपला कार्यभार नविन ग्रामसेवकांकडे देण्यापूर्वी त्यांनी, सर्व कामाचे तातडीने बिले काढण्याचा सपाटा लावला, त्यात झालेल्या कामाव्यतिरिक्त न झालेल्या कामाचे बिलेही काढल्यांने आता ते चर्चेचा विषय ठरले आहे. झालेल्या कामाचे बिलेही काढतांना कामाची गुणवत्ता न पाहताच, बिले काढल्यांचा आरोप होत असून, यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचीही चर्चा आहे.
याबाबत मारोडा ग्राम पंचायतीत विनोद मेश्राम यांचे जागेवर रूजू झालेले ग्रामसेवक खेमदेव श्रीरामे यांना या कामाबाबत विचारणा केली असता, त्यानी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नाही, आपण कॅशबुक अजूनपर्यंत पाहीले नाही, माझेकडे तीन ग्राम पंचायतीचा कार्यभार असल्यांने, तीन—चार दिवसात यासंदर्भात माहीती देवू अशी प्रतिक्रिया दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]