कोटगांव व जांभुळघाट येथे एकाच रात्री गावात घूसुन पट्टेदार वाघा ने केली गाईंची शिकार

एक गाय ठार तर गाय व गोरा गंभीर जखमी

वाघाचे बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालुक्यातील मौजा कोटगांव व जांभुळघाट येथे दिनांक.१९/१२/२०२३ ला एकाच रात्री दोन्ही गावात वाघा ने हमला करून एक गाय ठार तर दोन गाय व गोऱ्यास गंभीर जखमी केले असुन त्यांच्यावर उपचार सुरू आहे.हि घटना मंगळवारला रात्री ९ वाजताच्या दरम्यान कोटगाव येथील दामोधर दडमल यांच्या गावा लगत असलेल्या गुराच्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गाय व गोऱ्या वर पट्टेदार वाघाने हमला करून गंभीर जखमी केले असता त्यात एका गाईचा मुत्यु झाला.गावाच्या लोकांच्या आवाजाने वाघ तीथुन निघुन गेला. दुसरी घटना त्याच रात्रीला रात्री ३ ते ४ वाजतच्या सुमारास जांभुळघाट येथील गंगाधर जांभुळे यांच्या गुराच्या गोठ्यात बांधलेल्या गाईला पट्टेदार वाघाने हमला करून गंभीर जखमी केली.गायीच्या गोठ्या लगत झोपुन असलेल्या मालकाने आरडा-ओरड केल्याने वाघ तीथुन पळून गेला.या दोन्ही घटनेची दखल घेत वन विभाच्या वन रक्षक गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आले. हाच प्रकार पंधरा दिवसाच्या अगोदर मांगलगाव याठिकाणी घडला यात एक मैस तर पारडपार येथील बैल पट्टेदार वाघाने हल्ला करून ठार मारले होते.या परीसरात वाघाची गावा - गावा मध्ये , दहशत पसरली असून शेतकरी व जनतेमध्ये भितीचे वातावरन निर्माण झाले आहे. वन विभागा कडून तात्काळ आर्थिक मदत करून वाघा चे बदोवस्त करण्यात यावे आणि दैनंदिन वनविभागाने या परिसरात पेट्रोलिंग करावी अशी मागणी जनते कडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]