विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुल येथे रक्तदान शिबीर संपन्न

मुल:-विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एचडीएफसी बँक शाखा मुल तथा बौद्ध समाज मुल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
       "रक्तदान हेच श्रेष्ठदान" या संकल्पनेतून मुल येथील बौद्ध समाजातील युवकांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक आगळावेगळा उपक्रम राबवून समाजाला एक चांगला संदेश दिला. एचडीएफसी बँक शाखा मुल समिर दुप्पावार, अंकुश‌ दार्वेकर सर  आणि बौद्ध समाजाचे  युवा कार्यकर्ते डेविड खोब्रागडे,सुजित खोब्रागडे, विनोद निमगडे यांच्या संकल्पनेतून सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डेव्हिड खोब्रागडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून केले. भीमध्वज अर्ध्यापर्यंत फडकवून महामानवाला बुद्ध वंदना घेऊन आदरांजली वाहण्यात आली. रक्तदान शिबिरात महिलांनी व युवकांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून डेव्हिड खोब्रागडे कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद निमगडे, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते,प्रशांत उराडे, सुजित खोब्रागडे,सुरेश फुलझेले,काजु खोब्रागडे,शम्मी डोर्लीकर, पुरूषोत्तम साखरे,दिलीप गेडाम, बालु दुधे,पियुष गेडाम,वैभव चाटे,बबिता भडके, अर्चना भडके,सुमनताई खोब्रागडे, अनिकेत वाकडे,अजय रंगारी,रितीक शेंडे,दिक्षांत मेश्राम तथा अन्य बौद्ध समाजातील उपासक व उपासिका उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]