आणखी एक वाघाचा मृत्यू जिल्ह्यात खळबळ जनक घटना

आणखी एक वाघाचा मृत्यू जिल्ह्यात खळबळ जनक घटना
( चिंताजनक बाब ब्रह्मपुरी वन विभागात तीन दिवसात दोन वाघांचा , तर महिन्यात तिन वाघांचा मृत्यू)
(वर्ष भरात चंद्रपूर जिल्ह्यात 21 वाघांचा मृत्यू)
   
यश कायरकर :

      ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी अंतर्गत तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रालील  गोविंदपुर नियतक्षेत्र येथील जंगलालगतच्या मुमताज महम्मद नुरानी यांचा शेतातील गट क्रमांक 165/1 मध्ये सकाळी वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना एक वाघ शेतातील विहिरीत मृत अवस्थेत आढळून आला.


      सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन मोक्का चौकशी केली असता सदर मृत वाघ हा नर असून अंदाजे एक ते दीड वर्ष वयाचा असल्याचे आढळून आले. सदर वाघाचा छावक आपल्या एकाद्या शिकारीची पाठलाग करीत असताना जमीन लेवलला असलेल्या व कठळा नसलेल्या सदर विहिरीत पडून मेल्याची घटना घडली.
सदर घटनेच्या  मोका पंचनामा केले असता विहिरीत कठड्याच्या आत मध्ये वाघाने स्वतः ला वाचविण्यसाठी केलेल्या प्रयत्नात विहिरीच्या भिंतीवर त्याचे नक ओरबडल्याचे निशान मोठ्या प्रमाणात दिसून आले. पंचनामाच्या वेळी घटनास्थळी  परिसरातील स्वाब नेचर केअर फाउंडेशन चे अध्यक्ष यश कायरकर, बंडू धोतरे NTCA प्रतिनिधी, विवेक करंबेकर मानद वन्यजीव संरक्षक ब्रह्मपुरी, पंकज माकोडे नेचर एनवोर्मेन्ट अँड वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन ,  यांच्या उपस्थित मध्ये मौका पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता तळोधी वन विभागाच्या सावरगाव येथील लकडा डेपो मध्ये नेण्यात आले व शवविच्छेदन करण्यात आले.


      यावेळेस डॉ. रविकांत खोब्रागडे, पशुवैद्यकीय अधिकारी ताडोबा, डॉ. ममता वानखेडे पशुधन विकास अधिकारी नागभीड, यांनी शव विच्छेदन केले. व शव विच्छेदनानंतर वाघाला जाळण्यात आले. यावेळी सहाय्यक वनसंरक्षक ब्रह्मपुरी वन विभाग ब्रह्मपुरी चे एस. बी. हजारे, तळोदी बाळापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार, गोविंदपुर चे क्षेत्र सहाय्यक आर.एस. गायकवाड नेरी चे क्षेत्र  सहाय्यक रासेकर तथा, तळोदी बाळापुर वनपरिक्षेत्रातील संपूर्ण वन कर्मचारी व स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्य हे उपस्थित होते.
      
    येत्या तीन दिवसांमध्ये दोन तर महिन्यात तिन वाघ ब्रह्मपुरी वन विभागाअंतर्गत म‌त झाल्याच्या घटना घडल्या त्यात नागभिड वनपरिक्षेत्र अंतर्गत मिंडाळा बिट लगत 27 नोव्हेंबरला रेल्वेच्या धडकेमध्ये वाघाच्या बछड्याचे मृत्यू झाले होते, नंतर शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक 164 मध्ये शिकारी करिता लावलेल्या विद्युत प्रवाहात एक वाघ 21 डिसेंबर ला व आज 24 डिसेंबर ला तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये कठळा नसलेल्या विहिरीत पडून आज आनखी एक वाघ वृत्त असल्याची घटना निदर्शनास आली यामुळे येत्या तीन दिवसात दोन वाघ , तर महिन्यात तिन वाघ मेल्याच्या घटना घडल्या आशा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षामध्ये वर्षभरात एकूण 21 वाघ मेल्याच्या खळबळ जनक घटना घडल्या. यामधील काही घटना आपसी संघर्षातून, काही शिकारी मध्ये, तर काही अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना यामुळे वन विभागासाठी चिंतेचा विषय झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]