रस्त्यावरील खड्ड्यामुळे बस उतरली शेतात

सुदैवाने जीवितहानी टळली

जखमींनवर रुग्णालयात उपचार सुरू

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमूर वरून कांपा जाणाऱ्या रस्त्याची मागील एक वर्षापासून अवस्था मोठ्या प्रमाणावर खराब झालेली असून जागोजागी खडे पडलेले आहेत. या रस्त्याचे खड्डे बुजवीन्यासाठी सामाजिक संघटनेसोबत राजकीय पक्ष्यांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केली. परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने ( PWD ) घेतली नाही. हा पहिला अपघात नसून अनेक अपघात या मार्गावर झाले आहेत. दिनांक.१९ डिसेंबर २०२३ ला सकाळी ८ वाजता चिमूर वरून भंडारा करिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात जाऊन शिरली.या बसमध्ये एकूण ७० प्रवासी होते. शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपुर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहे. या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागास निवेदन देऊन दखल न घेतल्याने आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर यांचे नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. तब्बल ३ तास रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अभियंता समीर उपगणलावार आंदोलन स्थळी पोहचले व यावेळी डॉ.सतीश वारजूकर यांनी २३ डिसेंबर पर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा त्यांना अल्टिमेट दिला. आणि अभियंता समीर उपगणलावार यांनी आश्वासन  दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]