नवभारत कन्या विद्यालयात आज दिव्यांग विद्यार्थिनीचा सत्कारनवभारत कन्या विद्यालयात आज दिव्यांग विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. दिव्यांग समता सप्ताह निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ३ ते ९ डिसेंबर दिव्यांग समता सप्ताह समान संधी दिवसांचे औचित्य साधून नवभारत कन्या विद्यालयात विशेष गरजा धारक विद्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त राकेश नखाते सर यांच्याकडून दिव्यांग विद्यार्थिनी करिता शाळेला वाॅकर भेट दिली.
विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थिनीचा मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, विशेष शिक्षक इश्वर लोणबले, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
दिव्यांग हे समाजाचा समान भाग आहे त्यामुळे समाजांनी दिव्यांगांना आपल्या सोबतच प्रगतीची संधी द्यावी असे आवाहन या निमित्ताने मुख्याध्यापिका श्रीमती राजमलवार यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन विजय सिद्धावर यांनी तर आभार प्रदर्शन दिनेश जिड्डीवार यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]