सहा शेळ्यांना विषबाधा : तिन शेळ्या दगावल्या

सहा शेळ्यांना विषबाधा : तिन शेळ्या दगावल्या


तळोधी (बा.) नागभिड तालुक्यातील चिंधिचक येथील प्रमोद मोरेश्वर कावळे यांचे मालकीच्या सहा शेळ्यांना काल विषबाधा झाल्याने रात्रीं तिन शेळ्याचा गोठ्यातच मूत्यू झाला. तर अन्य तीन शेळ्या विषबाधेने ग्रस्त झाल्याची घटना आज सकाळी उजेडात आली. नेहमी प्रमाणे प्रमोद कावळे हा स्वताच्या शेळ्या चारायला शेतशिवारात न्यायचा मात्र काल त्याला बाहेरगावी जायचे असल्यामुळे घराजवळपास शेळ्या चारल्या मात्र कोणीतरी इसमांनी तुरीच्या झाडांवर किटकनाशक फवारणी केली असावी त्याचं परिसरात शेळ्यां फिरतं असतांनाच विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  पशुवैद्यकीय अधिकारी यांना घटनेची माहिती देण्यात आली असता. डॉ.विलास कालसर्पे यांनी विषग्रस्त शेळ्यावर उपचार सुरू केला असुन  मूत्यूमुखी पडलेल्या शेळ्यांचा मोका पंचनामा सरपंच प्रदिप समर्थ, कूषीसखी रंजना आठमांडे, सिआरपी सुगंधा समर्थ, जगदिश सडमाके यांचे उपस्थित करण्यात आला असुन सदर शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]